Twitter launches vertical videos : इन्स्टाग्राम, टिकटॉक आणि युट्युब शॉर्ट्सप्रमाणे आता ट्वीटरवरही vertical मध्ये व्हीडओ पाहाता येणार आहेत. ट्वीटरनं आपल्या युजर्सला आकर्षित करण्यासाठी नवीन फीचर आणलं आहे. या नव्या फीचरमुळे इन्स्टाग्राम, टिकटॉक आणि युट्युब शॉर्ट्सप्रमाणे आता ट्वीटरसुद्धा रील्सची मजा लुटता येणार आहे.
ट्वीटरने युजर्ससाठी दोन नवीन पद्धती आणल्या आहेत. इमर्सिव व्यूइंग आणि ईजी डिस्कवरी (Immersive viewing and easy discovery) तसेच इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मप्रमाणे एक्लप्लोअरमध्ये व्हीडिओ अधिक सुलभपणे पाहाता येणार आहे. ट्वीटरनं आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलेय की, 'व्हीडिओ सार्वजनिक आयुष्याचा एक अविभाज्य घटक झाला आहे. जे घडतेय ते शोधणं आणि दाखवणं सोपं करण्यासाठी, आम्ही ट्वीटरवर युजर्सला व्हीडिओचा एक्सपीरियन्स चांगला व्हावा यासाठी दोन नवीन फिचर्स इमर्सिव व्यूइंग आणि ईजी डिस्कवरी (Immersive viewing and easy discovery) आणत आहोत.'
नवीन फिचर कसं काम करणार ?
ट्वीटरनं ब्लॉगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, "ट्वीटरचा अपडेटेड इमर्सिव मीडिया व्यूअर एका क्लिकनंतर व्हीडिओ फूल स्क्रीनपर्यंत एक्सपेंड होईल. त्यामुळे सहजपणे फुल, इमर्सिव व्यूइंग एक्सपीरियंसपर्यंत युजर्सला पोहचता येईल. याला अॅक्टिव्ह करण्यासाठी ट्वीटर अॅपवर कोणत्याही व्हिडीओवर टॅप अथवा क्लीक करावं लागेल. त्यानंतर व्हीडिओ फूल स्क्रीन मोडमध्ये येईल.
व्हीडओ फूल स्क्रीन मोडमध्ये आल्यानंतर तुम्हाला दुसरे व्हीडिओ सर्च करणेही सोपं करण्यात आले आहे. जास्तीत जास्त आकर्षक व्हीडिओ सर्च करणं सुरु होईल. फक्त तुम्हाला स्क्रीनला स्क्रोल करायचं आहे. जर तुम्हाला यातून बाहेर निघायचं असेल आणि ट्वीटच्या होमपेजवर जायचं असेल तर.. वरती डाव्या बाजूला असलेल्या बॅक अॅरोवर क्लीक करा...
इमर्सिव मीडिया व्यूअर येणाऱ्या काही दिवसांत आयओएसवर इंग्रजीमध्ये ट्विटरचा वापर करणाऱ्यांसाठी लागू होणार आहे. त्यानंतर ठरावीक कालावधीनंतर सर्वच भाषांसाठी वापरात येऊ शकतं.
नवीन व्हीडिओ क्राऊजलसोबत युजर्सला आता सहजपणे आपल्या आवडीचे ट्वीट्स आणि ट्रेंड पाहाता येतील. त्यासोबतच सहजपणे आवडीचे व्हिडीओ शोधता येतील. ट्वीटरवर शेअर करण्यात आलेले लोकप्रिय व्हीडिओ शोधण्यासाठी युजर्स एक्सप्लोर टॅबवर जाऊ शकतो. सध्या व्हीडिओ क्राउजल Android आणि iOS वर इंग्रजीमध्ये ट्वीटर वापरणाऱ्या मोजक्याच लोकांसाठी उपलब्ध आहे.
Fleet प्रमाणे ट्वीटरचा हे आणखी एक फीचर आहे. कंपनीने सध्या प्रायोगिक तत्वावर सुरु केलेय. ट्वीटरला फ्लीट फीचरला माघारी घ्यावं लागलं होतं. कारण, ते व्यवस्थित काम करत नव्हते. त्याशिवाय ट्वीटरने आजपासून सर्व Android आणि iOS यूजर्ससाठी अधिकृतपणे edit tweet button हे फीचर सुरु केले आहे.