Google Maps : गुगल सर्च ऑन इव्हेंट 2022 मध्ये यूजर्सना चार नवीन फिचर्स पाहायला मिळाले. कंपनीने असा दावा केला आहे की, या फिचर्समुळे गुगल मॅपला खऱ्या जगासारखे दिसण्यास मदत होईल. वास्तविक, गुगल एका व्हिज्युअल आणि सोप्या नकाशावर काम करत आहे, ज्यामुळे यूजर्सना लोकेशनचा अनुभव घेता येणार आहे. यूजर्सना प्रत्यक्षात तिथे आहोत असा भास निर्माण करणारं हे फीचर असणार आहे. कंपनीच्या इव्हेंट दरम्यान कंपनीने Google Map अपग्रेड करण्यास मदत करण्यासाठी चार नवीन फीचर सादर केले आहेत.

  


नेबरहुड वाइब फिचर : 


समजा, जर तुम्ही घराभोवती फिरायला जात असाल तेव्हा नवीन काय पाहता येईल किंवा एक्सप्लोअर काय करू शकतो हे शोधणं कठीण होतं. मात्र, आता या नवीन अपडेटमध्ये गुगल मॅप्सने यावर उपाय आणला आहे. लवकरच, Google एक नवीन Vibe फिचर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ज्याचा वापर करून, यूजर्स त्यांच्या जवळील ठिकाण निवडू शकतील आणि Google Maps कम्युनिटीतील फोटो आणि माहितीद्वारे नकाशावरील सर्वात लोकप्रिय ठिकाणे पाहू शकतील. यासाठी रिव्ह्यू, फोटो आणि व्हिडीओ यांचा देखील समावेश असेल. नेबरहुड वाइब येत्या काही महिन्यांत Android आणि iOS दोन्हीवर आणले जाईल.


इमर्सिव व्यू फिचर :  


Google ने या वर्षाच्या सुरुवातीला I/O वर इमर्सिव्ह व्ह्यू फिचरचा उल्लेख केला होता. या फिचरच्या मदतीने यूजर्सना ट्रॅफिक, हवामान यांसारख्या महत्त्वाच्या माहितीसाठी त्या क्षेत्राच्या आजूबाजूचे दृश्य दिसू शकते. आता Google टोकियो टॉवर ते एक्रोपोलिस पर्यंत पसरलेल्या क्षेत्रांचे 250 हून अधिक फोटोरिअलिस्टिक एरियल व्ह्यू लाँच करत आहे.


लाईव्ह व्यू फिचर : 


तीन वर्षांपूर्वी, Google ने एक मार्ग सादर केला होता की लोक थेट दृश्यासह चालताना स्वतःला पाहू शकतात. आता Google लाईव्ह व्ह्यूसह नवीन फिचर लॉन्च करण्यासाठी इन-बिल्ड टेक्नॉलॉजीवर काम करत आहे. समजा तुम्ही एका अज्ञात शहरात आहात आणि तुम्हाला एटीएममधून पैसे काढायचे आहेत. अशा वेळी, यूजर्स लाईव्ह व्ह्यूसह शोधून त्या भागातील एटीएम शोधू शकतो. इतकंच नाही तर, तुम्ही किराणा दुकान, कॉफी शॉप्स आणि ट्रान्झिट स्टेशन्ससह विविध ठिकाणांनाही भेट देऊ शकता.


महत्वाच्या बातम्या :