मुंबई : ट्विटरने गणेशभक्तांसाठी खास भेट दिली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आठ इमोजी लॉन्च केले आहेत. विशेष म्हणजे इंग्रजीसोबत मराठीतही  हॅशटॅग तयार करण्यात आले आहेत.

 

ट्विटरवरील गणेशभक्त आता गणपतीच्या इमोजीसोबत ट्वीट करु शकतील. #GaneshChaturthi, #HappyGaneshChaturthi, #Ganeshotsav, #गणेशचतुर्थी, #गणेशोत्सव यांसारख्या हॅशटॅगचा वापर गणेशोत्सवाच्या काळात करता येणार आहे.

 

, , , ,

 

फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मीडियाचा वापर करत अनेक गणेश मंडळं अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू पाहतात. हेच लक्षात घेऊन ट्विटरने गणेशोत्सवासाठी खास इमोजी लॉन्च केले आहेत.

 

https://twitter.com/TwitterIndia/status/772465490128089089

 

अनेक गणेश मंडळं आपल्या गणपतीचे फोटो, व्हिडीओ, देखावे इत्यादी ट्विटरवर पोस्ट करतात. मात्र, ते एकाच क्लिकवर कधी उपलब्ध होत नाहीत. आता ट्विटरने खास हॅशटॅग लॉन्च केल्याने हे सर्व एकाच ठिकाणी पाहताही येणार आहे.

 

याआधी स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि दिवाळीतही स्पेशल इमोजी हॅशटॅग लॉन्च केले होते.