- महिलांना आयफोनचं आकर्षण पुरुषांच्या तुलनेत दुप्पट आहे.
- अँड्रॉईड युझर्सपेक्षा आपला दर्जा मोठा असल्याचा समज आयफोन युझर्सचा आहे.
- अँड्रॉईड युझर्समध्ये विनम्रता आणि प्रामाणिकपणा जास्त असतो.
सर्व्हेः आयफोन युझर्सपेक्षा अँड्रॉईड युझर्स जास्त विनम्र आणि प्रामाणिक!
एबीपी माझा वेब टीम | 04 Sep 2016 03:50 AM (IST)
नवी दिल्लीः तुमचा स्मार्टफोनच तुमचा स्वभाव कसा आहे ते सांगतो. अँड्रॉईड युझर्स आयफोन युझर्सपेक्षा विनम्र आणि प्रामाणिक असतात, असं एका अभ्यासात समोर आलं आहे. लिंकन विद्यापीठ आणि लँगकस्टर विद्यापीठ यांच्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली. आयफोन असणारे लोक जास्त प्रेमळ आहेत. मात्र अँड्रॉईड युझर्स जास्त उदार मनाचे आहेत, असं या सर्वेक्षणाच्या अभ्यासात आढळलं. संशोधकांनी या अभ्यासासाठी 240 जणांची निवड केली होती. यामध्ये काही स्वाभाविक बदल आढळून आले. काय आहेत सर्वेक्षणातील मुद्दे?