Tech News : भारत सरकारबरोबर सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरने (Twitter) मोठी घोषणा केली आहे. ट्विटर पुढील महिन्यात 3 ऑगस्टपासून फ्लीट्सचे फीचर (Fleets Feature) बंद करणार आहे. फ्लीट फीचर मागील वर्षी भारतासह दक्षिण कोरिया, इटली आणि ब्राझील येथे टेस्टिंगसाठी रिलीज करण्यात आलं होतं. त्यानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हे फीचर जागतिक पातळीवर लॉन्च केले गेले. या फीचरच्या मदतीने 24 तासांनंतर यूजर्सचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट ऑटोमॅटिकली गायब होत होती. 


फ्लिट्स फीचर का बंद केलं?


फ्लीट्स फीचर यूजर्सना जास्त आकर्षित करू शकले नाही, असं गृहीत धरून ट्विटरने हे फीचर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह कंपनीने याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. ट्विटरने आपल्या सर्व यूजर्ससाठी फ्लीट्स फीचर जागतिक स्तरावर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


इलोन मस्क यांनी केली मागणी 


टेस्ला आणि स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांनी ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांना विनंती केली की, फ्लीट्स फीचर बंद करण्याची मागणी केली. तसेच या बदल्यात एखादं नवीन फीचर आणण्याचीही मागणी त्यांनी केली. 


Fleet फीचर कसं वापरलं जातं?


जसं फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकली जाते आणि ती 24 तासानंतर अपोआप निघून जाते, त्याच्याशीच साधर्म्य साधत ट्विटरच्या होमपेजवर एकदम वरच्या बाजूस हे फिचर असतं. पहिल्या तुमच्या फोटोवर '+' चं चिन्ह दिसेल त्यावर क्लिक केल्यास, जसं तुम्ही ट्वीट करता त्यासारखंच 280 शब्दमर्यादा असलेलं टेक्स्ट हे Fleets मध्ये लिहू शकता, सोबतच फोटो आणि इतर गोष्टी तिथं टाकण्याचा ऑप्शन आपल्याला पाहायला मिळतील, तुम्हाला हवा तो मजकूर, फोटो तुम्ही निवडला की खालील बाजूस fleet हे बटन दिसेल ते दाबताच, तुमच्या स्टोरीला म्हणजेच ट्वीटरच्या fleets मध्ये तुमचा कॉन्टेन्ट दिवसभरात 24 तासासाठी दिसेल. एका पेक्षा अधिक fleet तुम्ही add करू शकता.