नवी दिल्ली : ट्विटरचे (TWITTER) सीईओ जॅक डोर्सी (CEO Jack Dorsey) लवकरच आपले पदाच्या राजीनामा देण्याची शक्यता आहे. डोर्सी सध्या ट्विटर आणि स्क्वायर या दोन कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. परंतु या संदर्भात ट्विटरकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 


इलियट मॅनेजमेंटचे संसथापक पॉल सिंगर म्हणाले होते की, जॅक डोर्सी यांनी दोन्ही कंपन्यापैकी एका कंपनीचे सीईओ पद सोडले पाहिजे. अद्याप डोर्सी यांच्या जागी कोणाची नियुक्ती करण्यात येणार याची माहिती समोर आलेली नाही. परंतु डोर्सी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तर नव्या सीईओला  कंपनीचे लक्ष्य पूर्ण करावे लागणार आहे. कंपनीने वर्षाच्या सुरुवातीला सांगितले होते की, 2023 पर्यंत 315 डेली अॅक्टिव्ह यूजर करण्याचे लक्ष्य दिले होते. तसेच वार्षिक उत्पन्न दुप्पट करण्याचे आव्हान देखील नव्या सीईओसमोर असणार आहे. 


काही दिवसांपूर्वी  ट्विटरने (Twitter)आपल्या लाईव्ह ऑडिओ चॅट रुम म्हणजे स्पेस (Spaces) वर होस्ट करण्यासाठी 600 फॉलोअर्सच्या संख्येची मर्यादा शिथिल केली आहे. गेल्या वर्षी सुरु iOS आणि अॅन्ड्रॉइड यूजर्ससाठी ट्विटरने स्पेसची सुरुवात केली होती. त्यावेळी ज्या यूजर्सला 600 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत त्यांनाच स्पेस होस्ट करण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु आता ही मर्यादा हटवण्यात आली आहे. ट्विटरने आपल्या फीचर्स आणि उपयोगितेत वाढ करण्यासाठी त्यांच्या धोरणात बदल करण्याचं ठरवलं आहे. या वर्षीच्या जून महिन्यात ट्विटरने आपल्या डेडिकेटेड टॅबची सुविधा उपलब्ध करुन देऊन आपल्या स्पेस सर्चच्या सुविधेला अधिक सुलभ बनवलं होतं. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात स्पेसला को-होस्ट करण्यासाठी ऑप्शन उपलब्ध करुन दिला होता. 


तर  भारतात जेव्हा कॉंग्रेस आणि ट्विटरमधील वाद विकोपाला गेला असताना माहेश्वरी यांची बदली करण्यात आली. ट्विटर इंडियाचे प्रमुख मनीष माहेश्वरी यांची भारतातून बदली करण्यात आली. त्यांना मायक्रो ब्लॉगिग साइट ट्विटरने पुन्हा अमेरिकेला बोलवले आहे. अमेरिकेत त्यांना नवी जबाबदारी देण्यात आली. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



संबंधित बातम्या :