न्यूयॉर्क : गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे ट्विटर अकाऊंट हॉक होणाच्या घटना सातत्याने घडत आहेत. शनिवारी ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक दोरसेंचं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एका मीडिया रिपोर्टने ही माहिती उघड केली. 'आवरमाइन' नामक एका संघटनेने दोरसेंचे ट्विटर अकाऊंट हॅक केल्याची जबाबदारी घेतली आहे. यापूर्वीही याच संघटनेने फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि गुगलचे सीईओ सुंदर पीचाई यांचे अकाऊंट हॅक केले होते.


 

टेक वेबसाइट एनगॅजेट डॉट कॉमने दिलेल्या रिपोर्टनुसार, दोरसेचे अकाऊंट 'आवरमाइन'द्वारे हॅक करून त्यावर प्रसारित करण्यात आलेले मॅसेज हे वाइन (3.25AM) वरून टाकण्यात आले आहेत.

 

रिपोर्टमध्ये म्हणले आहे की, दोरसेच्या अकाऊंटमधून वापरण्यात येणाऱ्या सुविधा, किंवा ज्याची सुरक्षा कमकुवत आहे, त्यामार्फत आवरमाइन्स दोरसेच्या पासवर्डपर्यंत पोहचू शकला आहे.

 

हॅकर्सने दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक मॅसेज पाहायला मिळत आहे. ''तुम्ही ज्या लिंकवर पोहचण्याचा प्रयत्न करीत आहात. त्याची ओळख ट्विटर किंवा त्यांच्या सहयोगीकडून पटवण्यात आलेली आहे. त्यामुळे त्या लिंकपर्यंत पोहचणे तुम्हाला नुकसान पोहचवू शकते,'' असे म्हटले आहे.

 

तर दुसरीकडे वाइनद्वारे जोडण्यात आलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर हा रेकॉर्ड आमच्या यूजरकडून नष्ट करण्यात आला असे सांगण्यात येत आहे.