मुंबई: सॅमसंगचा गॅलेक्सी जे 2(2016) भारतात लाँच करण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी जे 2(2016) एक ड्युअल सिम स्मार्टफोन आहे. सध्या हा सिल्वर आणि ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध आहे. कंपनी या हँडसेटसोबत 6 महिन्यांसाठी एअरटेलचा डबल डेटा ऑफरही देत आहे.

 

हा स्मार्टफोन नव्या स्मार्ट ग्लो फिचर आणि टर्बो स्पीड टेक्नॉलॉजीने उपलब्ध आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनसोबत ओपेरा मॅक्सचा अल्ट्रा डेटा सेव्हिंग मोड आणि एस बाइक मोडही मिळेल. स्मार्ट ग्लो फिचर  हे सॅमसंगकडून बनवण्यात आलेले नवे एलईडी नोटिफिकेशन आहे. याच्या मदतीने रिअर कॅमेराच्या एका कोपऱ्यात बनवण्यात आलेल्या रिंगला गरजेनुसार, कोणत्याही अॅप किंवा कनेक्ट करण्यासाठी कस्टमाइज करणे सोईचे होईल.

 

सॅमसंग गॅलेक्सी जे 2(2016) ची मुख्य वैशिष्ट्ये

 

5 इंचाचा एचडी (1290 x 720 पिक्सल) चा सुपर एमोलेड डिस्प्ले

 

1.5 गिगाहर्टस क्वाड-कोअर स्प्रेडट्रम एससी 8830 प्रोसेसर

 

इंटिग्रेटेड माली 400एमपी 2 जीपीयू

 

1.5 GB रॅम

 

Android 6.0 मार्शमैलो

 

इनबिल्ट स्टोअरेज 8 GB

 

8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा

 

5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा

 

4G LEB सपोर्ट

 

2600 एमएएच बॅटरी

 

किंमत 7,350 रुपये