Twitter Blue Tick : ट्विटरचे (Twitter) नवे मालक एलॉन मस्क (Elon Musk) ब्लू टिक ग्राहक सेवा पुन्हा सुरू करणार आहेत. अमेरिकेतील अनेक बनावट ट्विटर अकाऊंट्सनी $8 भरून ब्लू टिक मिळवले होते. या कारणामुळे ट्विटरने आपल्या ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवेवर बंदी घातली होती. मात्र, ते पुन्हा सुरू करण्यात येत आहे. ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी म्हटले आहे की, निलंबित केलेले ट्विटर ब्लू टिक सबस्क्रिप्शन 29 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू केले जाईल.


 


 






एलॉन मस्क यांनी ट्विट करत दिली माहिती


दरम्यान, एलॉन मस्क यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. त्यांनी म्हटलंय, "ब्लू व्हेरिफाईड 29 नोव्हेंबरपर्यंत पुन्हा लाँच केले जात आहे." यापूर्वी एलॉन मस्क यांनी ब्लू टिक ग्राहक सेवा सुरू करण्याबाबत इशारा दिला होता. मागील आठवड्यात एलॉन मस्क यांनी एका युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले होते की, ही सेवा पुढील आठवड्यात पुन्हा सुरू केली जाईल. दरम्यान, आतापर्यंत ब्लू टिकसाठी $8 भरावे लागत नव्हते, तर अमेरिका, कॅनडासह इतर अनेक देशांमध्ये ब्लू टिक व्हेरिफिकेशन सेवा सुरू करण्यात आली होती जी iOS यूजर्ससाठी उपलब्ध होती.


 





 






 


मस्क यांनी ट्विटरवर केले अनेक बदल


एलॉन मस्कच्या हाती ट्विटर आल्यानंतर त्यांनी अनेक बदल केले आहेत. मालकी हक्क मिळताच त्यांनी सर्वप्रथम कंपनीच्या सीईओसह अनेक अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. यानंतर त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. त्यानंतर ट्विटर सबस्क्रिप्शनवर आधारित ब्लू टिक सबस्क्रिप्शन केले. अशा सर्व बदलांमुळे मस्क वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.


इतर महत्वाची बातमी


Twitter : युजर्संना ट्विटर वापरण्यात अडथळे, मस्क यांनी मागितली माफी; नवीन फिचरबद्दल दिली माहिती