Elon Musk on Twitter : जगातील श्रीमंत व्यक्ती आणि ट्विटरचे ( Twitter ) नवे मालक एलॉन मस्क ( Elon Musk ) सध्या ट्विटरमध्ये मोठे बदल करत आहेत. 44 अब्ज डॉलर रुपयांना ट्विटर ( Twitter Deal ) खरेदी केल्यापासून त्यांनी कंपनीमध्ये अनेक बदल केले आहेत. दरम्यान, काही देशांमध्ये युजर्सना ट्विटर वापरण्यात अडथळे येत आहेत. या संदर्भात मस्क यांनी ट्विट करत माफी मागितली आहे. शिवाय मस्क यांनी ट्विटरच्या नवीन फिचर बद्दल माहिती दिली आहे. ट्विटरचा कारभार हाती घेतल्यापासून एलॉन मस्क यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. अलिकडे ट्विटरवरील ब्लू टिक पेड सबस्क्रिप्शनची सेवा त्यांनी बंद केली. ही सेवा नव्या रुपाने पुन्हा सुरु केली जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


एलॉन मस्क यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'अनेक देशांमध्ये ट्विटर अतिशय संथपणे काम आहे. याबद्दल मी युजर्सची माफी मागतो. त्यांनी ट्विटर करत ट्विटरवर येत असलेल्या समस्येसंबंधित तांत्रिक माहिती दिली आहे. यासोबतच मस्क यांनी ट्विटरच्या नवीन फिचर बद्दल माहिती दिली आहे. मस्क यांनी ट्विटरची मालकी घेतल्यापासून त्यांनी ट्विटर कंपनी आणि या सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्येही अनेक बदल केले आहेत.






एलॉन मस्क यांचे ट्विटरवर 115 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. मस्क अलिकडे ट्विटरमुळे चर्चेत असले, तरी याआधीही मस्क त्यांचे ट्विट तर कधी त्यांच्या पर्सनल लाईफमुळे सतत चर्चेत असायचे.


नव्या फिचरबद्द्ल दिली 'ही' माहिती  


मस्क यांनी ट्विटरच्या नवीन फिचरबाबत माहिती दिली आहे. मस्क यांनी ट्विट करत सांगितलं आहे की, 'ट्विटर लवकरच कंपन्या आणि संस्थांना त्यांच्याशी इतर कोणती ट्विटर अकाउंट लिंक आहेत हे ओळखण्यात मदत करेल.' हे नवं फिचर लवकरच लाँच करण्यात येणार असल्याचं मस्क यांनी सांगितलं आहे.






ट्विटरचा 8 डॉलरच्या पेड सबस्क्रिप्शनचा निर्णय मागे


मीडिया रिपोर्टनुसार, ट्विटरने ब्लू टिक पेड सबस्क्रिप्शन सेवा बंद केली आहे. ही सर्व्हिस सुरु झाल्यापासून बनावट अकाऊंटच्या संख्येत झपाट्याने वाढू लागली होती, त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पेड सबस्क्रिप्शन सेवा सुरू झाल्यापासून ट्विटरवरील बनावट अकाऊंटची संख्या झपाट्याने वाढू लागली, ही बाब लक्षात घेऊन कंपनीने ही सेवा कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.