मुंबई : फेसबुक डेटा लीक प्रकरण समोर आल्यापासून फेसबुकवर अकाऊंट सुरक्षित आहे का नाही, हे तपासण्यासाठी एक ट्रेंड आला आहे. BFF हे टाईप करा, ते हिरव्या रंगात दिसलं तर अकाऊंट सुरक्षित आहे आणि न दिसल्यास अकाऊंट असुरक्षित आहे, असा अर्थ काढला जातो.
BFF चा अर्थ काय आहे?
बेस्ट फ्रेंड फॉरएव्हर असा या BFF चा अर्थ आहे. सोशल नेटवर्किंग साईट पिंटरेस्टने आधी हा BFF टॅग म्हणून वापरला. मैत्री व्यक्त करण्याची ती छान हॉट की आहे. याची माहिती नसल्याने किंवा गंमत म्हणून काही युझर्स एखाद्याची BFF ची अक्षरे हिरवी झाली वा झाली नाहीत तर तुमचे फेसबुक खाते सेफ वा अनसेफ आहे, अशा अर्थाच्या पोस्ट्स करत आहेत. याला कोणताही आधार नाही.
BFF चा सुरक्षिततेशी संबंध आहे?
ज्याप्रमाणे 'अभिनंदन', 'congratulations' 'best wishes' हे शब्द हॉट कीजच्या स्वरुपात फेसबुकवर रंगीत डिस्प्ले होतात, तशीच BFF ही देखील एक की आहे जी रंगीत डिस्प्ले होते. मैत्री प्रकटनाचे हे एक प्रतिक आहे.
BFF रंगीत असण्याचा किंवा नसण्याचा युझरच्या सुरक्षिततेशी कसलाही संबंध नाही. ज्यांचे फेसबुक अपडेटेड नाही त्यांनी कॉमेंट वा पोस्टमध्ये BFF ही अक्षरे लिहून एंटर केल्यावर एका बाजूने केशरी आणि एका बाजूने निळा हात एकत्र येऊन टाळी वाजवून संगीतात लुप्त होत नाहीत आणि अक्षरे हिरवी होत नाहीत. फेसबुकची नवी अपडेट असेल तरच BFF हिरव्या रंगात दिसेल.
व्हायरल सत्य : BFF हिरव्या रंगात पोस्ट झालं तरच अकाऊंट सुरक्षित?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Mar 2018 09:01 PM (IST)
BFF हे टाईप करा, ते हिरव्या रंगात दिसलं तर अकाऊंट सुरक्षित आहे आणि न दिसल्यास अकाऊंट असुरक्षित आहे, असा अर्थ काढला जातो.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -