नवी दिल्ली: केम्ब्रिज अनालिटिका डेटा स्कँडलमुळे आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या फेसबुकला आणखी एक धक्का बसला आहे.


अमेरिकन उद्योजक एलन मस्क यांनी त्यांच्या स्पेस एक्स आणि टेस्ला या कंपन्यांचे लाखो लाईक्स असलेले फेसबुक पेज डिलीट केले आहेत.  टेस्ला ही इलेक्ट्रीक कार तयार करणारी नामांकित कंपनी आहे.

एलन मस्क यांना फेसबुक पेज डिलीट करण्याचं आव्हान देण्यात आलं होतं. त्यांनी ते आव्हान स्वीकारलं आणि स्पेक्स एक्स, टेस्ला ही पेजस डिलीट केली.

तुमची खासगी माहिती फेसबुक कसं चोरतं आणि कुणाला देतं?

यापूर्वी व्हॉट्सअॅपचे सहसंस्थापक ब्रायन अॅक्टन यांनीही फेसबुक डिलीट करण्याची वेळ आली आहे, असं म्हटलं होतं. त्यानंतर एलन मस्क यांनी थेट कृती केल्याने, हळूहळू फेसबुक आपला विश्वास गमावत आहे. फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग याच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.

SpaceX  या फेसबुक पेजला जवळपास 26 लाख लाईक्स होते, तर Tesla फेसबुक पेजलाही जवळपास तितकेच म्हणजेच 24 लाख लाईक्स होते.

फेसबुक लीक : भारतातील कुठल्या पक्षाचे हात दगडाखाली?

लाईक्सची एव्हढी मोठी संख्या असणारी ही दोन पेज आता लॉगआऊट करण्यात आली आहेत. मात्र एलन मस्क यांचं वैयक्तिक मात्र अनधिकृत पेज अजूनही सुरु असल्याचं दिसतं. त्यांच्या नावे अनेक फेसबुक पेज आहेत, त्यातील अनेक बनावटही आहेत.

दरम्यान, सध्या ट्विटरवर #deletefacebook हा ट्रेण्ड सुरु आहे. त्यामध्ये व्हॉट्सअॅपच्या सहसंस्थापकानंतर आता टेस्लाच्या सीईओंनी सहभाग नोंदवला आहे.

काय आहे फेसबुक डेटा लीक प्रकरण?

2017 साली अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मदत करणाऱ्या 'केम्ब्रिज अॅनालिटिका' या कंपनीने जवळपास 5 कोटी फेसबुक यूजर्सची वैयक्तिक माहिती चोरली, असा आरोप करण्यात आला होता. या चोरलेल्या माहितीचा निवडणुकीत वापरही केला, असाही आरोप आहे.

ब्रिटनस्थित केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीने डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कशाप्रकारे मदत केली, यासंदर्भात अमेरिकन आणि युरोपियन खासदारांनी 'फेसबुक इंक'कडे उत्तर मागितले आहे.

एकंदरीत फेसबुकवरील वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत.

फेसबुकवरुन लाखो युजर्स ‘लॉग आऊट’

डेटा घाटोळ्यानंतर लाखो युझर्सनी फेसबुकला रामराम ठोकला आहे. चौथ्या तिमाहीत अमेरिका आणि कॅनडात फेसबुक युजर्सची संख्या तब्बल एक कोटीने घटली आहे.

अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीच्या काळात पाच कोटी युजर्सची माहिती फेसबुककडून लीक झाली होती. या काळात गमावलेला युजर्सचा विश्वास फेसबुकला अद्याप संपन्न करता आलेला नाही. याचा परिणाम फेसबुक युजर्सच्या संख्येवर होताना दिसत आहे.

सोमवारी फेसबुकच्या संपत्तीत 37 अब्ज डॉलरची घट झाली. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनाही 6.6 अब्ज डॉलरचं नुकसान सहन करावं लागलं आहे. अमेरिका आणि युरोपमधल्या काही देशांत फेसबुकची चौकशीही सुरू आहे.

संबंधित बातम्या

आमची चूक झाली, मार्क झुकरबर्गचा माफीनामा 

फेसबुक लीक : भारतातील कुठल्या पक्षाचे हात दगडाखाली?

'डेटा चोर काँग्रेस'... फेसबुकच्या डेटा लीकचे भारतात पडसाद

डेटा लीक प्रकरणानंतर फेसबुकवरुन लाखो युजर्स ‘लॉग आऊट’

फेसबुकला दणका, एका दिवसात 395 अब्ज रुपयांचं नुकसान


वेळ आलीय, फेसबुक डिलीट करा : व्हॉट्सअॅप सहसंस्थापक 

तुमची खासगी माहिती फेसबुक कसं चोरतं आणि कुणाला देतं?