TrueCaller हे मोबाईल अॅप्लिकेशन बनवणाऱ्या कंपनीने आता आपल्या अॅपद्वारे इंटरनेट कॉलिंगची सुविधाही उपलब्ध करुन दिली आहे. TrueCaller च्या जगभरातील जवळपास 140 कोटी युजर्सना याचा वापर करता येणार आहे.


True Caller ही ऑनलाईन विश्वातील सध्याची सर्वात मोठी टेलिफोन डिरेक्टरी मानली जाते. एखादा अज्ञात मोबाईल किंवा लँडलाईन क्रमांक नेमका कोणाचा आहे याचा शोध घेण्यासाठी अनेक जण True Caller अॅपचा वापर करतात. या फिचरमुळे हे अॅप मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाल्यानंतर कंपनीने आतात 'TrueCaller Voice' या नावाने इंटरनेट कॉलिंगची सेवा सुरु केली आहे. ही सेवा VoIP बेस्ड असून वायफाय किंवा मोबाईल डेटाचा वापर करुन Truecaller अॅपद्वारे कॉल करता येणार आहे.

भविष्यात TrueCaller अॅपद्वारे युजर्सना कॉल, टेक्स्ट मेसेज, इन्स्टंट मेसेज यासोबत डिजीटल पेमेंटही करता यावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. 'TrueCaller Voice' ही सेवा अँड्रॉइड युजर्ससाठी सुरुवातीला उपलब्ध करुन देण्यात असून आयओएस युजर्सना पुढच्या काही आठवड्यांत ही सेवा मिळणार आहे.

आणखी वाचा :

भविष्यात व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवण्यासाठी 'फिगरप्रिंट' अनिवार्य?

सॅमसंगनंतर Huawei कंपनीनेही 'फोल्डेबल स्मार्टफोनचं लाँचिंग पुढे ढकललं