3 डिसेंबरपर्यंत जिओचं सिम घेणाऱ्यांनाच फ्री कॉलिंग ऑफर!
एबीपी माझा वेब टीम | 21 Oct 2016 08:47 AM (IST)
मुंबई: रिलायन्स जिओची 'वेलकम ऑफर' म्हणजेच मोफत कॉलिंग सेवा ही केवळ तीन डिसेंबरपर्यंत सिम कार्ड विकत घेणाऱ्यांनाच लागू होणार आहे. 31 डिसेंबरपर्यंत फ्री कॉलिंग सेवा ऑफरची घोषणा रिलायन्स जिओकडून करण्यात आली होती. त्यामुळे 3 डिसेंबरपर्यंत सिम कार्ड विकत घेणाऱ्या यूजर्सनाच ही ऑफर लागू होणार आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओचं मागील महिन्यात 1 सप्टेबरला लाँचिंग करण्यात आलं होतं. दुसरीकडे ट्रायनं जिओला आपली मोफत सेवा 3 डिसेंबरपर्यंत देण्याचे आदेश दिले आहेत. नियमानुसार, केवळ 90 दिवसांपर्यंतच अशी ऑफर देता येते. ज्याचा कालावधील 3 डिसेंबरला संपत आहे. यासंबंधी जिओच्या प्रवक्त्यांनी माहिती दिली की, 'जिओची 'वेलकम ऑफर' 31 डिसेंबरपर्यंत सुरु असणार आहे. पण त्यासाठी ग्राहकांना ३ डिसेंबपर्यंत जिओचं कार्ड घ्यावं लागेल.' संबंधित बातम्या: जिओची फ्री कॉलिंग सेवा फक्त 3 डिसेंबरपर्यंतच, ट्रायचे निर्देश