मुंबई: मोबाईल क्षेत्रात क्रांती घडवणाऱ्या रिलायन्स जिओला ट्रायच्या नव्या नियमानं चाप लावला आहे. 31 डिसेंबरपर्यंत मोफत कॉलिंग सेवा देणाऱ्या रिलायन्सला आपला निर्णय बदलावा लागण्याची शक्यता आहे.


रिलायन्स जिओला केवळ 3 डिसेंबरपर्यंत मोफत कॉलिंग सेवा देता येईल असा आदेश ट्रायनं दिला आहे. इतर स्पर्धक कंपन्यांनी रिलायन्स ट्रायच्या नियमांचं उल्लंघन करत असल्याची तक्रार ट्रायकडे केली होती. त्यानंतर ट्रायनं नियमानुसार केवळ ९० दिवसच रिलायन्स जिओला मोफत कॉलिंग देण्याचा आदेश दिला आहे.
दरम्यान, दुसरीकडे रिलायन्स जिओच्या मते, नियमानुसार 31 डिसेंबरपर्यंतच ही सेवा देण्यात येणार आहे. त्यामुळे रिलायन्स आता ट्रायचा आदेश मानणार की, 31 डिसेंबरपर्यंत मोफत सेवा सुरु ठेवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या:


जिओ म्हणजे व्यावसायिक निर्णय, जुगार नाही : मुकेश अंबानी