मुंबई : काही दिवसांपूर्वीच लॉन्च झालेल्या टोयोटाची इनोव्हा क्रिस्टाबाबत आता चांगल्या प्रतिक्रिया ऐकायला मिळू लागल्या आहेत. टोयोटाने या प्रीमियम एमपीव्ही गाडी  2 मे रोजी लॉन्च केली होती.

 

टोयोटा कंपनीच्या माहितीनुसार, 60 टक्के बुकिंग ऑटोमेटिक व्हेरिएंटसाठी केली गेलीय. कंपनीला कारप्रेमींकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं टोयोटाकडून सांगण्यात आलं आहे.

 

टोयोटा इनोव्हा क्रिस्टामध्ये G, Gx, Vx आणि Zx असे एकूण 4 व्हेरिएंट आहेत. इनोव्हा क्रिस्टाची दिल्लीतल एक्स शोरुममध्ये 13 लाख 83 हजार रुपये ते 20 लाख 77 हजार रुपये किंमत आहे. कंपनीने इनोव्हा क्रिस्टाच्या डिलिव्हरीलाही सुरुवात केली आहे.

 

टोयोटा इनोव्हा क्रिस्टामध्ये नव्या फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. नवीन आणि नव्या लूकसोबत ही गाडी लॉन्च केली असून, ऑटोमेटिक ट्रान्समिशनही देण्यात आलं आहे. ऑटोमिक ट्रान्समिशन असणारी इनोव्हा क्रिस्टाचे दोन व्हेरिएंट आहेत.

 

नवी टोयोटा इनोव्हाला कंपनीने TNGA प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. ही कार दोन डिझेल इंजिन ऑप्शनसोबत उपलब्ध आहे, त्यामध्ये एक म्हणजे 2.4 लिटर डिझेल आणि दुसरी म्हणजे 2.8 लिटर डिझेल इंजिन.

 
कारमध्ये 4.2 इंच टीएफटी मल्टी फंक्शन डिस्प्ले, 7 इंच टचस्क्रीन सिस्टम, डीव्हीडी प्लेयर, सेकेंड आणि थर्ड रो सीटसाठी एसी व्हेंट, 20 बॉटल होल्डर इत्यादी अत्याधुनिक फीचर्स दिले गेले आहेत.