नवी दिल्ली: आपण विकत घेत असलेल्या कार मध्ये सेफ्टी फीचर्स उपलब्ध असणं अत्यंत आवश्यक असतं. परंतु यावर खूप कमी लोक ध्यान देतात. GNCAP कडून आतापर्यंत खूप कमी कार्सना 5 स्टार रेटिंग देण्यात आली आहे. GNCAP म्हणजे है ग्लोबल न्यू कार असेसमेंट प्रोग्राम. ही एक यूकेतील फाउंडेशन आहे जे कारचे असेसमेंट करते. ग्लोबल NCAP कारच्या सेफ्टी फीचर्स, रोड सेफ्टी आणि इतर सुरक्षा मानकांचा तपास करते आणि त्यानुसार रेटिंग देते.


GNCAP कडून साधारणत: बेस व्हर्जनचे परीक्षण करण्यात येतं. सेफ्टी स्कोर, कारचे स्ट्रकचर आणि कार मधील सेफ्टी फीचरची संख्या यावर हे परिक्षण अवलंबून असतं. आतापर्यंत खूप कमी भारतीय कार्स याचे मापदंड पूर्ण करु शकल्या आहेत. आम्ही आपल्याला सांगणार आहोत की 5 स्टार रेटिंग मिळवणाऱ्या कार कोणत्या आहेत.


टाटा नेक्सन
टाटा नेक्सन ही भारताची पहिली 5 स्टार कार आहे. ज्याचे परीक्षण करण्यात आलं होतं ती प्रीफेसलिफ्ट मॉडल होती. असे असून सुध्दा नेक्सनने 5 स्टार मिळवले. नेक्सनला अॅडल्ट प्रोटेक्शनसाठी 5 स्टार आणि चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी 3 स्टार रेटिंग देण्यात आले आहे.


नेक्सनला याआधी चार स्टार मिळाले होते. त्यानंतर टाटा कंपनीने यात अनेक सेफ्टी फीचर्स वाढवले. ज्यात प्रवासी आणि ड्रायव्हरच्या सीट बेल्ट रिमाइंडरचा देखील समावेश होतो. त्याचसोबत नेक्सनला एक साइड इम्पॅक्ट टेस्ट पास करण्यासाठी UN95 साइड इम्पॅक्ट प्रोटेक्शन रिक्वायरमेंट्सला मॅच करणं आवश्यक होतं.



महिंद्रा XUV300
महिंद्रा XUV300 ची चाचणी यावर्षीच्या सुरुवातीला झाली होती. या कारने ग्लोबल NCAP चा सर्वात पहिला ‘सेफर चॉइस’ अवॉर्ड जिंकला होता. हा अवॉर्ड ऑटोमेकर्सना भारतातील सुरक्षेचे उच्चतम मानकंन पूर्ण करण्यासाठी देण्यात येतो. याच्या अॅडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी 5 स्टार रेटिंग तर चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी 4 स्टार रेटिंग देण्यात आली होती. हे पादचारी सुरक्षा आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल ‘सेफर चॉइस’ अवॉर्डच्या मानांकनाला पूर्ण करतात.



टाटा एल्ट्रोज
टाटा एल्ट्रोजची सुरक्षा चाचणी या वर्षाच्या जानेवारी महिन्यात झाली होती. त्यात या कारला 5 स्टार मिळाले होते. अॅडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी 5 स्टार तर चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनसाठी या कारला 3 स्टार रेटिंग मिळाली आहे. या बेस मॉडलला मानकाच्या स्वरुपात 2 एयरबॅग सोबत दाखल करण्यात आलं होतं. याची संरचना आणि फुटवेल एरियाला स्थिर मानण्यात आलंय. याची अॅडल्ट हेड आणि नेक सुरक्षादेखील चांगल्या दर्जाची मानली गेलीय. चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनदेखील चांगल्या प्रतिची असल्याचं दिसून आलंय. 5 स्टार प्राप्त करणारी ही एकमेव हॅचबॅक कार आहे.


महत्वाच्या बातम्या: