मुंबई : गेल्या काही महिन्यांत 'टिक टॉक' अॅप भारतात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले आहे. चीनच्या ByteDance या कंपनीच्या मालकीचं असलेलं टिक टॉक अॅप मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाल्यानंतर कंपनीने आता मोबाईल फोन निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच टिक टॉकचा फोन बाजारात येणार असून शाओमी, विवो, ओपो या कंपन्यांच्या फोनला टक्कर देणार आहे.
चीनच्या ByteDance या कंपनीची मालकी असलेल्या टिक टॉक अॅपची मोठ्या प्रमाणावर क्रेझ आहे. गेल्यावर्षी कंपनीने 'म्युजिकली' हे अॅप विकत घेतल्यानंतर टिक टॉकचे भारतातील युजर्स मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. आता ही कंपनी मोबाईल फोन निर्मिती करणार असल्याची माहिती मिळत आहे. या फोनमध्ये टिक टॉक अॅपसह ByteDance कंपनीचे इतर अॅप प्रिलोडेड असणार आहेत. टिक टॉक अॅप वापरणाऱ्या बहुतांश लोकांचा विचार करुन या फोनची किंमत ठरवण्यात येणार आहे. मात्र याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
सामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत फोन उपलब्ध करुन देताना ByteDance या कंपनीला सध्या बाजारात असलेल्या कंपन्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे. भारतातील स्मार्टफोनच्या बाजारात सध्या असलेल्या कंपन्यांना टिक टॉकचा हा नवा फोन टक्कर देणार आहे.