मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून युट्यूब विरूद्ध टिकटॉक हा वाद सुरु आहे. अशातच एका टिकटॉक युजरने अॅसिड अटॅकबाबत एक व्हिडीओ क्लिप शेअर केली. त्यानंतर अनेक ट्रोलर्सनी या युजरवर टिकेची झोडच उठवली. आधीच युट्यूब विरूद्ध टिकटॉक या वादाने टिकटॉकच्या रेटिंगवर परिणाम झाला होता. त्यात टिकटॉकरच्या व्हिडीओची भर पडली. हा व्हिडीओ आणि असेच इतर व्हिडीओ टिकटॉकने डिलीट केले. हा व्हिडीओ तयार करणाऱ्या फैजल सिद्दीकी या टिकटॉकरने माफीही मागितली. आता गुगलनेही या प्रकरणात उडी घेतली आहे. गुगलने हस्तक्षेप केला असून गुगलने टिकटॉकच्या निगेटिव्ह रेटिंग्स कमी केल्या आहेत. यासंदर्भात गुगलने रिसर्च केल्यानंतर असं आढळून आलं की, टिक टॉक अॅपला रिव्ह्यू देणाऱ्या अनेकांनी फेक अकाउंट तयार केले होते. त्यामुळे अॅड्रॉइड मार्केटप्लेसमध्ये टिकटॉकची रेटिंग दोन स्टारपेक्षा खाली गेली होती. त्यामुळे गुगलने या फेक अकाउंटवरून करण्यात आलेल्या निगेटिव्ह रेटिंग्स कमी केल्या आहेत.
फैजल सिद्दीकीने टिकटॉकवर शेअर केलेल्या वादग्रस्त व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलं आहे की, युजर फैजल सिद्दीकी एका मुलीला धमकी देत आहे. जिने त्याच्याशी असलेलं नातं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर राग अनावर झालेला फैजल तिच्या चेहऱ्यावर एक लिक्विड टाकतो. हे पाणी होतं. पण त्यानंतर पुढच्या सीनमध्ये त्या मुलीने चेहरा झाकून घेतला आहे. ज्यावर अनेक दाग आणि जखमा दाखवण्यात आल्या आहेत. ज्यामधून तिच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकल्याचं दाखवण्यात आलं होतं.
गुगलने डिलीट केले 5 मिलियन क्रिटिक्स
टिकटॉकवरून हा व्हिडीओ काढून टाकल्यानंतर गुगलने टिकटॉकच्या निगेटिव्ह रिव्ह्यूजपैकी 5 मिलियनहून अधिक रिव्ह्यू हटवले आहेत. परंतु, इतर रेटिंग्स तशाच ठेवल्या आहेत. यासंदर्भात बोलताना गुगलच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, 'त्यांनी या व्हिडीओच्या क्रिटीक्सवर सुधारात्मक कारवाई केली होती.'
टिकटॉकने केलं अकाउंट सस्पेंड
व्हिडीओबाबत टिक टॉकचे प्रवक्ते म्हणाले की, 'पॉलिसीनुसार, आम्ही अशा कंन्टेटची परवानगी देत नाही. ज्यामुळे इतरांची सुरक्षा धोक्यात येईल किंवा महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना दुजोरा देण्यात आला असेल. या व्हिडीओने आमच्या नियमांचं उल्लंघन केलं असून आम्ही हा कन्टेन आमच्या प्लॅटफॉर्मवरून हटवला आहे. तसेच अकाउंटही सस्पेंड करण्यात आलं आहे. तसेच याप्रकरणाची कायदेशीररित्या चौकशी करण्यात येणार आहे.'
संबंधित बातम्या :
यूट्यूबर विरुद्ध टिकटॉकर वादाचा टिकटॉकच्या रेटिंगला फटका, टिकटॉकचं रेटिंग 2.0 वर