मुंबई : ग्रुप अॅडमिनसाठी आता व्हॉट्सअॅपने तीन फीचर्स अपडेट केले आहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅप ग्रुपवर अॅडमिनचा भाव आणखी वाढणार आहे. व्हॉट्सअॅपने अॅडमिनसाठी नेमके कोणते फीचर अपडेट केले आहेत त्यावर एक नजर...


व्हॉट्सअॅपने रेक्ट्रीक्ट हे फीचर लाँच केलं असून यामुळे ग्रुप अॅडमिनला बरेच अधिकार मिळाले आहेत. या फीचरमुळे अॅडमिन ग्रुपमधील एखाद्या सदस्याला ग्रुपमध्ये पोस्ट टाकण्यास मनाई करु शकतो. यासोबतच ग्रुपमधील सदस्याला सर्च करणंही सोपं झालं आहे. त्यामुळे ग्रुपवर अॅडमिनचं बरंच नियंत्रण राहणार आहे.

व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वी ग्रुप इन्फो हे फीचर लाँच केले होते. आता या फीचरचं अपडेट सर्व यूजर्संना मिळणार आहे. यामध्ये ग्रुपची माहिती मिळणार आहे. कोणीही यूजर ग्रुप इन्फोमध्ये जाऊन ग्रुपची माहिती मिळवू शकतो. पण अॅडमिनचं त्यावर नियंत्रण असणार आहे.

व्हॉटसअॅपवरील ग्रुपमध्ये आपण @ या चिन्हाने त्या ग्रुपमधील सदस्याला मेन्शन करु शकतो. हेच फिचर आता अपडेट करण्यात आलं आहे.

व्हॉट्सअॅपचे हे नवीन अपडेट अँड्रॉईड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमवर मिळणार आहे.