नवी दिल्लीः मोबाईलचा बॅटरी बॅकअप वाढवण्यासाठी संशोधकांनी नवीन कल्पना शोधली आहे. मोबाईल, टॅबलेट आणि लॅपटॉपमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम बॅटऱ्यांची क्षमता यामुळे वाढवता येणं शक्य होणार आहे.


नव्या संशोधनानुसार बॅटरी क्षमतेला 10 ते 30 टक्क्यांपर्यंत फायदा होणार आहे. या स्वस्त आणि लाँग लाईफच्या बॅटरीचा शोध कोलंबिया विद्यापीठात लावण्यात आला आहे.

बॅटरी पहिल्यांदा चार्ज केल्यानंतर 5 ते 20 टक्के चार्जिंग व्यर्थ जाते. या व्यर्थ गेलेल्या चार्जिंगला परत मिळवण्यास संशोधकांना यश आलं आहे. यामुळे पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक्स आणि वाहनांची बॅटरी क्षमता वाढवण्यासाठी मदत होणार आहे, अशी माहिती संशोधक प्रोफेसर युयान यांग यांनी दिली.