नवी दिल्लीः सॅमसंग on सीरीजचा सॅमसंग On nxt भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. 18 हजार 490 रुपये किंमत असलेला हा फोन सध्या फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा नवा स्मार्टफोन गेल्या आठवड्यात लाँच करण्यात आला होता. या फोनचा लूक जवळपास on7 या स्मार्टफोनप्रमाणेच आहे. on7 या स्मार्टफोनला बाजारात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आता या फोनला कसा प्रतिसाद मिळतो, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दमदार फीचर्स आणि कमी किंमत यामुळे हा फोन ग्राहकांना आवडेल, असा अंदाज लावला जात आहे. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर या फोनवर ग्राहकांची उडी पडण्याची शक्यता आहे. सॅमसंग On nxt चे फीचर्स
  • 5.5 इंच आकाराची स्क्रीन
  • 1.6GHz ऑक्टाकोअर प्रोसेसर
  • 3 GB रॅम, 32 GB इंटर्नल स्टोरेज
  • ड्युअल नॅनो सिम सपोर्ट
  • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • 3300mAh क्षमतेची बॅटरी