नवी दिल्लीः सॅमसंगने पहिल्यांदाच 6 GB रॅम असणारा स्मार्टफोन लाँच केला आहे. C9 प्रो असं या फोनचं नाव आहे. या फोनबद्दल आतापर्यंत अनेक अफवा समोर येत होत्या, अखेर फोन लाँच झाल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
C9 प्रोमध्ये 6 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज आहे. सॅमसंगने यापूर्वी 4 GB रॅमचा स्मार्टफोन लाँच केला आहे. मात्र एवढी स्टोरेज क्षमता असणारा हा पहिलाच फोन आहे.
या फोनला मेटल बॉडी आणि 6 इंच आकाराची एचडी स्क्रीन आहे. तर 653 क्लालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आलं आहे. हा फोन अँड्रॉईड सिस्टीम 6.0.1 सपोर्टेड आहे.
या फोनला 4000mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. होम बटनमध्येच फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आलं असून हायटेक म्युझिक फीचर्स देण्यात आले आहेत.
या फोनची विशेषता म्हणजे 16 मेगापिक्सेलचा रिअर आणि 16 मेगापिक्सेलचाच फ्रंट कॅमेराही देण्यात आला आहे. चीनमध्ये या फोनची किंमत 3199 युआन म्हणजे 31 हजार 999 रुपये आहे.
चीनमध्ये या फोनची विक्री 11 नोव्हेंबरपासून सुरु करण्यात येणार आहे. मात्र भारतात हा फोन कधी येणार याबाबत अजून कसलीही माहिती देण्यात आली नाही.