मुंबई : जर तुम्ही डेस्कटॉप किंवा लॅपटॉप वापरत असाल तर कीबोर्डवर एक नजर टाका. तुम्हाला F आणि J या बटणांमध्ये काही वेगळेपण जाणवला का? व्यवस्थित पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की या बटणांवर हलक्या खुणा आहेत. पण ही बटणं अशी का आहेत हे तुम्हाला माहित आहे का?


 

F आणि J या बटणांवर खुणा अशासाठी आहेत की, तुम्ही टाईप करण्यासाठी कीबोर्डकडे न पाहता बोटं योग्य पोझिशनमध्ये ठेवू शकता. या खुणा जाणवल्यानंतर तुम्ही तुमचे हात टाईप करण्याच्या योग्य पोझिशनमध्ये आणू शकता.

 

ज्यावेळी डाव्या हाताचं पहिलं बोट F वर असतं तेव्हा इतर बोटं A,S आणि D असतात. तर उजव्या हाताचं पहिलं बोट J वर असतं त्यावेळी इतर तीन बोटं K,L आणि कोलन (;)वर असतं. तसंच दोन्ही हातांचे अंगठे स्पेस बारवर असतात.

 

याचप्रकारे दोन्ही हात ठेवल्यावर सर्व बोटं बटणांपर्यंत पोहचू शकतात आणि स्क्रीनकडे न बघता वेगाने टाईप करु शकता.

 

या खुणांचा शोध जून ई बॉटिश यांनी केला होता. फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या बॉटिश यांनी हे मॉडिफिकेशन एप्रिल 2002 मध्ये पेटंट केलं होतं.