मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांच्या नावावर हिंदी सिनेसृष्टीचे अनेक विक्रमांची नोंद आहे. आता बिग बींच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. ट्विटर अमिताभ यांच्या फॉलोअर्सची संख्या 2 कोटी 10 लाखांवर पोहोचली आहे.
2.1 कोटी ट्विटर फॉलअर्स संख्या असलेले अमिताभ हे भारतातील एकमेव सेलिब्रेटी आहेत. ट्विटरच्या माध्यमातून अमिताभ आपल्या चाहत्यांशी कायम संवाद साधतात आणि त्यांच्या संपर्कात राहतात.
https://twitter.com/SrBachchan/status/734127294730493952
73 वर्षीय अमिताभ बच्चन यांच्यानंतर बॉलिवूड सेलिब्रेटींमध्ये शाहरुख खानचा (1.96 कोटी फॉलोअर्स) नंबर लागतो, तर शाहरुखनंतर सलमान खानचा (1.4 कोटी फॉलोअर्स) नंबर लागतो.
2.1 कोटी फॉलोअर्स संख्या झाल्यानंतर अमिताभ यांनी आनंद व्यक्त करणारा एक ट्वीट केला आहे. "T 2263 - #AB21Million ... yohohohohohohohohohhhooooooo .." असा ट्वीट करत अमिताभ यांनी आनंद व्यक्त केला आहे.