'OnePlus 7 ' या स्मार्टफोनच्या लाँचिंगची तारीख शेवटी ठरली आहे. प्रिमियम श्रेणीतील लोकप्रिय मोबाईल कंपनी वनप्लसच्या या नव्या फोनच्या लाँचिंगबाबत गेल्या अनेक दिवसांपासून अंदाज बांधले जात होते. जगभरात 14 मे ला 'वनप्लस 7' लाँच केला जाणार आहेत. अमेरिका, युरोप आणि भारतात कंपनीकडून लाँचिंग इव्हेंट आयोजित केले जाणार आहे. तसेच या इव्हेंटचे लाईव्ह स्ट्रिमिंगदेखील करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून OnePlus 7 चे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या फोनच्या फिचर्सबाबतही अनेक अंदाज बांधले जात होते. वनप्लसचे सीईओ पेट लऊ यांनी मंगळवारी या नव्या फोनच्या लाँचिंग बाबत ट्विटरवर माहिती दिली आहे. लऊ यांनी सांगितले की हा नवा फोन डिस्प्लेच्या बाबतीत याआधीच्या फोनपेक्षा अधिक चांगला असणार आहे. या फोनच्या डिस्प्लेवर कंपनी तिप्पट खर्च करणार असल्याचेही लऊ यांनी सांगितले. या फोनमध्ये 90Hz पेक्षा जास्त रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. यापूर्वी अॅपलच्या आयपॅड प्रो मध्ये 120Hz डिस्प्ले वापरण्यात आला आहे. त्यामुळे वनप्लसच्या या नव्या फोनचा डिस्प्ले आतापर्यंतचा कंपनीचा सर्वोत्कृष्ट असणार आहे. या नव्या डिस्प्लेमुळे फोनची किंमत जास्त असू शकते.
वनप्लस 7 च्या स्पेसिफिकेशन्सबाबत कंपनीकडून अधिक माहिती देण्यात आलेली नाही. परंतू हा फोन 5G सपोर्ट करणारा असू शकतो असा अंदाज बांधला जात आहे. वनप्लसच्या मोबाईलमध्ये वापरण्यात येणारा स्नॅपड्रॅगन 855 चिपसेट प्रोसेसर 5G सपोर्ट करणारा प्रोसेसर आहे. त्यामुळे वनप्लस 7 हा 5G सपोर्ट असलेला हा पहिला स्मार्टफोन असू शकतो. तसेच या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा असल्याचाही अंदाज लावला जात आहे. वनप्लसचा हा नवा मोबाईल फोन वॉटरप्रुफ असेल का? तसेच वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल का? याबाबतही ग्राहकांमध्ये उत्सुकता आहे.
'OnePlus 7' च्या लाँचिंगची तारीख ठरली, कसा असेल वनप्लसचा नवा फोन?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Apr 2019 12:41 PM (IST)
जगभरात 14 मे ला 'वनप्लस 7' लाँच केला जाणार आहेत. अमेरिका, युरोप आणि भारतात कंपनीकडून लाँचिंग इव्हेंट आयोजित केले जाणार आहे.

प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -