लंडन/मॉस्को : सोमवारी जगभरात व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा काही तासांसाठी ठप्प झाल्याने याचा परिणाम अनेक क्षेत्रांवर झालेला पहायला मिळाला. दरम्यान याचा फायदा मेसेजिंग अॅप टेलीग्रामला मोठ्या प्रमाणात झाला आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा विस्कळीत झाल्याच्या दरम्यान  70 दशलक्षाहून अधिक नवीन वापरकर्ते जोडले गेले असल्याची माहिती संस्थापक पावेल दुरोव (Pavel Durov) यांनी मंगळवारी दिली. कारण, जगभरातील लोकांना जवळपास सहा तास मुख्य संदेश सेवांशिवाय जोडून ठेवले.


या व्यत्ययामुळे 3.5 अब्ज वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि मेसेंजर सारख्या सेवा वापरण्यात अडचणी आल्याचं फेसबुकने सांगितले. 


दुरोव म्हणाले, की "टेलीग्रामचा दैनंदिन वाढीचा दर प्रमाणापेक्षा अधिक आहे आणि आम्ही एका दिवसात इतर प्लॅटफॉर्मवरून 70 दशलक्ष नवीन युजर्सला जोडले आहे." दुरोव म्हणाले की अमेरिकेत काही वापरकर्त्यांना कमी स्पीड मिळत होता. कारण, अचानक लाखो लोकांनी एकाच वेळी साइन अप करण्यासाठी गर्दी केली होती. परंतु, ही सेवा बहुसंख्य लोकांसाठी नेहमीप्रमाणे काम करत होती.


युरोपियन युनियनच्या antitrust  प्रमुख मार्ग्रेथ वेस्टेगर यांनी सांगितले की, या आउटेजमुळे काही मोठ्या players वर अवलंबून राहण्याचे परिणाम दिसून आले आणि अधिक प्रतिस्पर्ध्यांची गरज असल्याचेही अधोरेखित झाले.


रशियाने सांगितले की या घटनेने मॉस्कोला स्वतःचे सार्वभौम इंटरनेट प्लॅटफॉर्म आणि सोशल नेटवर्क विकसित करणे आवश्यक असल्याचं समोर आलं आहे.


सहा तास सेवा विस्कळीत
जगभरात व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम जगभरात काम करेनासे झाले होते. ट्विटर सुमारे सव्वा तास ठप्प होते. सोमवारी सायंकाळी 9.30 वाजता व्हॉट्सअॅपवर अडथळा येऊ लागला. त्यानंतर रिफ्रेश करूनही माहिती अपडेट होत नसल्याचं दिसून आलं. युजर्सकडून  डाऊन झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. तर फेसबुकच्या वेबसाईटवर यूजर्ससाठी एक मेसेज लिहिला आहे. "काही कारणांमुळे फेसबुक वापरण्यास अडथळा येत आहे. आम्ही यावर काम करत असून लवकरात लवकर समस्या दूर करू. असुविधेसाठी क्षमस्व."