Tecno Camon 19 Pro 5G Launch : स्मार्टफोन ब्रँड (Tecno) ने भारतीय बाजारपेठेत आपला मध्यम श्रेणीचा स्मार्टफोन Tecno Camon 19 Pro 5G लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सेल कॅमेरा आहे, जो कस्टम डिझाईन केलेल्या RGBW + (G + P) सेन्सरसह येतो. तसेच, टेक्नोच्या या स्मार्टफोनच्या मागील कॅमेरामध्ये OIS आणि HIS चा सपोर्ट देखील उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये Android 12 सह 6.8-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. यासोबत MediaTek Dimensity 810 प्रोसेसर देण्यात आला आहे. Tecno Camon 19 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 8 GB LPDDR4x रॅमचा सपोर्टही देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये आणखी काय वैशिष्ट्य आहे ते जाणून घ्या. 


Tecno Camon 19 Pro 5G चे फिचर्स : 



  • Tecno Camon 19 Pro 5G फोन Android 12 आधारित HiOS 8.6 वर काम करतो.

  • Tecno Camon 19 Pro 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट (1,080×2,460 पिक्सेल) रिझोल्यूशनसह 6.8-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे.

  • MediaTek Dimensity 810 प्रोसेसर Tecno Camon 19 Pro 5G फोनमध्ये उपलब्ध आहे.

  • Tecno Camon 19 Pro 5G मध्ये 8 GB LPDDR4x RAM आणि 128 GB UFS 2.2 स्टोरेज आहे. RAM देखील 13 GB पर्यंत वर्चुअली वाढवता येते.

  • हा Tecno फोन गेमिंगसाठी MediaTek HyperEngine 2.0 आणि Mali-G57 GPU ला देखील सपोर्ट करतो. 

  • Tecno Camon 19 Pro 5G मध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

  • कनेक्टिव्हिटीसाठी, Tecno Camon 19 Pro 5G मध्ये ड्युअल बँड Wi-Fi, 5G (12 बँड सपोर्ट), 4G LTE, OTG, NFC, Bluetooth v5.0 आणि USB Type-C पोर्ट आहेत.

  • सेफ्टीसाठी, Tecno Camon 19 Pro 5G मध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.


Tecno Camon 19 Pro 5G + कॅमेरा :


Tecno Camon 19 Pro 5G मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 64-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे. OIS आणि HIS सपोर्ट देखील मागील कॅमेरा मध्ये उपलब्ध आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये 2 + 2 मेगापिक्सलचे आणखी दोन कॅमेरे उपलब्ध आहेत. स्मार्टफोनमध्ये 16 MP फ्रंट कॅमेरा देखील आहे, जो f/2.45 अपर्चर सह येतो.


Tecno Camon 19 Pro 5G ची किंमत :


Tecno Camon 19 Pro 5G इको ब्लॅक आणि सीडर ग्रीन कलरमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्याच्या 8 GB रॅम + 128 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन रिटेल स्टोअरमधून 12 ऑगस्टपासून खरेदी करता येईल.


महत्वाच्या बातम्या :