Google Rewards : इंदूरमध्ये बग्समिरर (Bugsmirror) नावाची कंपनी चालवणाऱ्या अमन पांडेला (Aman Pandey) गुगलने 300 चुका शोधून काढल्याबद्दल सुमारे 65 कोटी रुपयांचे बक्षीस दिले आहे. अमन पांडे मूळचा झारखंडचा आहे. त्याने सुरुवातीचे शिक्षण पत्राटू या छोट्या गावात केले. तो बारावीपर्यंत शिकण्यासाठी बोकारोला गेला. बोकारेच्या चिन्मय शाळेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर अमनने भोपाळ एनआयटीमधून बीटेक (B. tech) केले.


अमनने सांगितले की, बग्समिरर कंपनी जानेवारी 2021 मध्ये सुरू झाली. सध्या मॅनेजमेंट टीममध्ये चार लोक आणि एकूण 15 कर्मचारी आहेत. ते म्हणाले, "आम्ही याची सुरुवात स्टार्टअप म्हणून केली होती. पण जवळपास दोन वर्षांपासून आम्ही गुगलच्या उणिवा शोधण्याचा प्रयत्न करत होतो."


Google कडून मिळालेल्या पुरस्काराची रक्कम कंपनीमध्ये वापरली जाईल


त्याला आतापर्यंत 300 हून अधिक चुका सापडल्या आहेत. बगस्मिरर कंपनीत सुमारे 15 कर्मचारी काम करतात. सॅमसंगने चुका शोधून बक्षीसही दिल्याचे अमनचे म्हणणे आहे. पुढे त्यांनी असं सांगितलं आहे की, एवढ्यावरच न थांबता आम्ही आणखी एक फंक्शन डेव्हलप करण्याच्या मार्गावर आहोत. प्ले स्टोअरवरून अॅप डाऊनलोड केल्यावर हे फीचर उपलब्ध होईल. यामध्ये यूजर्स फीचरवर क्लिक करून, सुरक्षेच्या उद्देशाने अॅप तुमच्यासाठी किती योग्य किंवा चुकीचे आहे हे शोधू शकतील. 


गुगलकडून मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेच्या प्रश्नावर, अमनने असं सांगितले की, तो कंपनीला पुढे नेण्यासाठी ही रक्कम वापरणार आहेत. गुगलने आतापर्यंत अनेक बक्षीस पाठवल्याचा दावाही त्याने केला आहे. सध्या अमन अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम करत आहे. आयुष्याचा प्रवास नुकताच सुरू झाला आहे, पण ध्येय खूप दूर आहे, असं तो म्हणतो. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha