मुंबई : शाओमी (Xiaomi) चा 48 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला मिड-रेंज स्मार्टफोन Redmi Note 7 Pro स्वस्त झाला आहे. कंपनीने या फोनची किंमत कायमसाठी दोन हजार रुपयांनी कमी केली आहे. कपातीनंतर या फोनची सुरुवातीची किंमत आता 11,999 रुपये झाली आहे.
फोन किती रुपयांना मिळणार?
कंपनीने हा फोन 2019 च्या सुरुवातीला लॉन्च केला होता. लॉन्चच्या वेळी 4 GB रॅम +64 GB इंटरनल स्टोअरेज असलेल्या व्हेरियंटची किंमत 13,999 रुपये होती, आता ती 11,999 रुपये केली आहे.
6 GB रॅम+64 GB स्टोअरेज व्हेरियंटचा फोन आता 13,999 रुपयांना मिळणार आहे. तसंच 6 GB रॅम+128 GB स्टोअरेजच्या टॉप-एंड व्हेरियंटबद्दल बोलायचं झालं तर तो आता 16,999 रुपयांऐवजी 14,999 रुपयात खरेदी करता येऊ शकतो. कपात झालेल्या दरांसह हा फोन फ्लिपकार्टसह mi.com वर मिळत आहे.
रेडमी नोट 7 प्रो चे स्पेसिफिकेशन्स
- 2340x1080 पिक्सेल रिझॉल्यूशन
- 6.3 इंचाचा फूल एचडी+डॉट नॉच डिस्प्ले
- 48 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेऱ्यासह 5 मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा
- सेल्फीसाठी 13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 675 चिपसेट प्रोसेसर
-4,000mAh ची बॅटरी
रेडमी नोट 8 लॉन्च होण्याची शक्यता
शाओमी रेडमी नोट 8 लॉन्च करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे रेडमी नोट 7 प्रोची किंमत कमी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शाओमीने चीनमध्ये नवी रेडमी नोट सीरिज लॉन्च केली होती. चीनमध्ये लॉन्च केलेल्या रेडमी नोट 8 ची किंमत 999 युआन (सुमारे 10,000 रुपये) आणि रेडमी नोट 8 प्रोची किंमत 1,399 युआन (सुमारे 14,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. आता कंपनी हा फोन भारतात कधी लॉन्च करणार याची माहिती देण्यात आलेली नाही.