Vivo Y73 : Vivo ने भारतात परवडणारे 4 जी स्मार्टफोन म्हणून Vivo Y73 लॉन्च केला आहे.  सिंगल रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनसह दोन रंगांच्या पर्यायांमध्ये हा फोन लॉन्च करण्यात आला आहे. यात ऑक्टा-कोर मीडियाटेक प्रोसेसर आणि ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. Vivo Y73 हा एक स्लिम फोन आहे.  हा फोन केवळ 7.38 मिमी जाडीची आणि कमी वजनाचा आहे.


Vivo Y73 किंमत आणि ऑफर


भारतात Vivo Y73 फोन 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 20,990 रुपये आहे. हा फोन डायमंड फ्लेअर आणि रोमन ब्लॅक कलरमध्ये सादर लॉन्च करण्यात आला आहे. Vivo इंडिया ऑनलाइन स्टोअर, अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम, टाटा क्लिक, बजाज ईएमआय स्टोअर आणि ऑफलाइन पार्टनर रिटेल स्टोअरच्या माध्यमातून या फोनची खरेदी करता येईल. आतापर्यंत हा फोन फक्त फ्लिपकार्ट आणि व्हिवो इंडिया स्टोअरमध्ये विक्रीसाठी लिस्टेड केला आहे.


व्हिवो इंडिया स्टोअरच्या सेलमध्ये एचडीएफसी बँक डेबिट आणि क्रेडिट ईएमआयवर 500 कॅशबॅक उपलब्ध आहे. बजाज फिनसर्ववर नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय उपलब्ध आहे. त्याचबरोबर फ्लिपकार्ट, फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड ट्रान्जॅक्शनवर 5 टक्केपर्यंत कॅशबॅक ऑफर आहे.


Vivo Y73 ची स्पेसिफिकेशन


ड्युअल-सिम (नॅनो) Vivo Y73 Android 11 वर आधारित Funtouch OS 11.1 वर काम करतो. यात 6.44-इंचाचा फुल-एचडी + (1080 × 2400 पिक्सेल) एएमओएलईडी डिस्प्ले आहे. फोनमध्ये 3 जीबी एक्सटेंडेड रॅम फीचरसह ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो जी 95 प्रोसेसर आणि 8 जीबी रॅम देण्यात आला आहे. फोनमध्ये 128 जीबी ऑनबोर्ड स्टोरेज आहे जो मायक्रोएसडी कार्डद्वारे 1 टीबी पर्यंत वाढवता येतो.