OnePlus Nord CE Launched : वनप्लसने गुरुवारी संध्याकाळी समर लॉन्च इव्हेंटमध्ये आपला क्लासी स्मार्टफोन OnePlus Nord CE 5G स्मार्टफोन लॉन्च केला. या फोनची सुरुवातीची किंमत 22,999 रुपये ठेवण्यात आली आहे. गुरुवारी संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरु झालेल्या इव्हेंटमध्ये कंपनीने स्मार्टफोन व्यतिरिक्त स्मार्ट टीव्हीही लॉन्च केला. या स्मार्टफोनची प्री-बुकिंग 11 जूनपासून सुरु झाला आहे. प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळणार आहे. युजर्स या फोनची आतुरतेनं वाट पाहत होते. या इव्हेंटची कंपनीकडून ऑफिशिअल वेबसाईटवर लाईव्ह स्ट्रिमिंगही करण्यात आली. कंपनीनं या बजेट स्मार्टफोनमध्ये जबरदस्त फिचर्स दिलेले आहेत. या स्मार्टफोनची डिझाईन आणि कलर अॅट्रॅक्टिव्ह आहे. जाणून घेऊया या स्मार्टफोनच्या क्लासी फिचर्सबाबत... 


OnePlus Nord CE स्मार्टफोनची 10 वैशिष्ट्य : 


1. OnePlus Nord CE च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 22,990 रुपये आहे. 


2. स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किंमत 24,999 रुपये आहे. 


3. स्मार्टफोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असणाऱ्या व्हेरियंटची किमत 27,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. 


4. वनप्लसच्या या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 750G processor देण्यात आला आहे. 


5. या स्मार्टफोनमध्ये 6.43 इंच 90Hz Fluid AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. 


6. फोनमध्ये जहरदस्त कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड, 2MP डेप्थ सेंसर आहे. सेल्फीसाठी यामध्ये 16MP शानदार कॅमेरा देण्यात आला आहे. 


7. वनप्लसच्या या स्मार्टफोनमध्ये 4500mAh क्षमतेची जबरदस्त बॅटरी देण्यात आली आहे. याची बॅटरी Warp Charge 30T ला सपोर्ट करेल. 


8. स्मार्टफोनमध्ये 2 वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर अपडेट आणि 3 वर्षांपर्यंत सिक्युरिटी अपडेट मिळत राहील. 


9. OnePlus Nord CE ला लोक OnePlus Store आणि Amazon India मार्फत 11 जूनपासून प्री-ऑर्डर करु शकते. याचा सेल 16 जूनपासून सुरु होणार आहे.


10. या स्मार्टफोनला वेगवेगळ्या कलर व्हेरियंट्समध्ये लॉन्च केलं आहे. युजर्स आपल्या आवडीनुसार, कलरची निवड करु शकतात. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :