Tech News : Vivo ची सबब्रँड iQOO ने भारतात आतापर्यंत बरेच स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. भारतातील iQOO 7 5G स्मार्टफोनलाही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा फोन कमी किमतीत खरेदी करण्याची चांगली संधी सध्या आहे. अॅमेझॉन इंडियाच्या बिग सेव्हिंग डे सेलचा आज शेवटचा दिवस आहे. सेलमध्ये iQOO 7 5G फोनवर अनेक ऑफर दिल्या जात आहेत. या फोनची किंमत आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊया.


किंमत आणि ऑफर्स 


iQOO 7 5G च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 31,990 रुपये आहे. तर 12 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनची किंमत 35,990 रुपये आहे.  8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज असणार्‍या फोनची किंमत 33,990 रुपये आहे. अॅमेझॉन बिग सेव्हिंग डे सेलमध्ये iQOO 7 5G स्मार्टफोनवर एसबीआयकडून (State Bank Of India) 2000 रुपयांची त्वरित सवलत दिली जात आहे. त्याचबरोबर अॅमेझॉन पेद्वारे (Amazon Pay) हा फोन खरेदी करण्यासाठी 1000 रुपयांचा कॅशबॅकदेखील उपलब्ध आहे. तसेच, नो कॉस्ट ईएमआय ऑप्शनसह हा फोन खरेदी करता येऊ शकतो. 


स्पेसिफिकेशन


iQOO 7 5G स्मार्टफोनमध्ये 6.62 इंचाचा फुल एचडी + एमोलेड डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्झ आहे. हा फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज आहे, जो मायक्रोएसडी कार्डद्वारे देखील वाढवू शकतो.


कॅमेरा


iQOO 7 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात Sony IMX598 सह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. सेकंडरी कॅमेरा 13 मेगापिक्सेल देण्यात आला आहे. तर 2 मेगापिक्सलचा मोनो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.


बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी


iQOO 7 5G स्मार्टफोनमध्ये 4400 एमएएच बॅटरी आहे, जी 66W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कनेक्टिव्हिटीसाठी 5 जी एसए/एनएसए, 4 जी एलटीई, वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ 5.1, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.