मुंबई : रात्रीच्या वेळी गाडीने प्रवास करत असाल तर गाडी चालवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी गाडी चालवताना लोक बर्‍याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतात, यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. परंतु आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि खबरदारी घेतली पाहिजे जेणेकरुन कोणत्याही प्रकारचे अपघात टाळता येतील. चला या खास गोष्टी काय आहेत ते जाणून घेऊया.


सर्व लाईट्स ठीक आहेत याची खात्री करा


जर आपण रात्री वाहन चालवत असाल तर हेडलाईटसह सर्व लाईट्स योग्यरित्या कार्यरत आहेत की नाही याची पुष्टी करा. लाईट्स योग्यरित्या काम करत नसल्यास त्यांना मॅकेनिककडे जाऊन नीट करुन घ्या.


सर्व काचा, आरसे स्वच्छ करा आणि नीट सेट करा


रात्रीच्या वेळी गाडी चालवताना आधी सर्व काचा साफ करा. विंडशील्ड साफ न केल्यास त्यामुळे गाडी चालवताना अडचण येऊ शकतात. समोरून प्रकाश पडल्यामुळे त्यामध्ये अधिक त्रास होतो. म्हणूनच, सर्व काचा स्वच्छ कराव्या. यासह, बाहेरील आणि आतील आरसे योग्यरित्या सेट केल्या पाहिजेत.


कारमधील लाईट्स बंद करा


गाडी चालवताना आतील लाईट्स लावू नयेत. तसेच डॅशबोर्डच्या लाईट्सचा बाईटनेस कमी करुन ठेवा. गाडीतील लाईट जास्त असल्यास समोरच्या दृश्यमानतेमध्ये फरक पडतो आणि स्पष्ट दिसत नाही. म्हणून आतला प्रकाश नेहमीच कमी किंवा बंद ठेवला पाहिजे.


केवळ हायवेवर हाय बिम्ब लाईट वापरा


शहरात कार चालवताना हाय बिम्ब लाइट बंद ठेवा आणि लो बिम्ब लाईटमध्ये गाडी चालवा. फक्त महामार्गावर हाय बिम्ब लाईटचा वापर करा किंवा त्या ठिकाणी जास्तीत जास्त अंधार आहे किंवा जेथे स्ट्रीट लाईन नसेल. लांबपर्यंत पाहायचं असल्यास लिम्ब लाईट वापर करतात. मात्र शहरात स्ट्रीट लाईट असतात म्हणून शहरात लो लिम्ब लाईटचा वापर करा.


अंतर ठेवून गाडी चालवा 


वाहन चालवताना अंतर राखले पाहिजे. पुढील कार आणि आपले वाहन दरम्यान अंतर असले पाहिजे. जर आपल्याला कार थांबवायची असेल तर त्यासाठी आपल्याला पुरेसा वेळ मिळेल. महामार्गावर विशेष काळजी घेतली पाहिजे.