मुंबई: चीनमधील टीसीएल कॉर्पोरेशनं सोमवारी भारतात आपला पहिला TCL 560 स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे डोळ्यानं अनलॉक होणारं फीचर यामध्ये देण्यात आलं आहे. या स्मार्टफोनची किंमत 7,999 रु. एवढी आहे. हा स्मार्टफोन 5 जुलैपासून अमेझॉनवर उपलब्ध आहे.


कंपनीचे भारतातील विपणन संचालक रणजीत गोपी यांनी सांगितलं की, 'आम्ही भारतीय बाजारपेठेत प्रवेश करीत आहोत. त्यामुळे गुणवत्ता नियंत्रित करणं गरजेचं आहे.'

TCL 560 स्मार्टफोनचे खास फीचर:

TCL 560 स्मार्टफोनमध्ये 5.5 इंच एचडी आयपीएस डिस्प्ले आहे. ज्याचं रेझ्युलेशन 720x1280 आहे. यामध्ये 2 जीबी रॅमसोबत क्वॉड-कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे.

हा स्मार्टफोन अँड्रॉईड मार्शमेलो 6.0 ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित आहे. यामध्ये इनबिल्ट मेमरी 16 जीबी आहे. मायक्रो एसडी कार्डने 32 जीबीपर्यंत मेमरी वाढविता येऊ शकते.

या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि एलईडी फ्लॅशही देण्यात आला आहे. तर 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनची बॅटरी 2,500 mAh एवढ्या क्षमतेची आहे.