मुंबई: आयटी क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना वाईट बातमी आहे. देशात बेरोजगारीचे प्रमाण दिवसागणिक वाढत असताना, आयटी क्षेत्रात काम कारणाऱ्या तरुणांवरही बेरोजगारीची टांगती तलवार कायम आहे. एका सर्वेक्षणानुसार देशातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या सहा लाख तरुणांना आपल्या नोकरीवर पाणी सोडावे लागणार आहे.
अमेरिकेतील HFC या रिसर्च संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, सध्या देशात आयटी क्षेत्रात ३.५ मिलियन तरुण कार्यरत आहेत. भारतातील आयटीच्या कंपन्या अर्थिक ओझ्याखाली दबल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात जवळपास या कंपन्या ६.४ लाखाच्या आसपास नोकऱ्यांमध्य़े कपात करण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण जगात अॅटोमॅटिक टेक्नॉलॅजी क्षेत्रात झपाट्याने होणारा विकास हे देखील एक कारण असल्याचे सांगितले जात आहे.
HFC या एक रिसर्च संस्थेचे सीईओ फिल फ्रेस्टने दिलेल्या माहितीनुसार, ''गेल्या दोन दशकांमध्ये भारताच्या आयटी क्षेत्रात मोठी तेजीचे वातावरण होते. पण सध्या याच क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने भारतीय आयटी कंपन्यांमधून कर्मचारी कपात करण्यात येऊ शकते.''