टोरंटो : जे पालक आपल्या चिमुरड्याला स्मार्टफोन किंवा टॅबलेट हताळण्यासाठी देतात, त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण स्मार्टफोन आणि टॅबलेटचा अधिक काळ वापराने तुमच्या मुलांच्या बोलण्याची क्षमता विकसित होण्यास उशीर लागतो.
टोरंटोमध्ये 2011 ते 2015 दरम्यान या विषयावर संशोधन झालं आहे. या संशोधनात सहा महिन्याच्या मुलापासून ते दोन वर्षांच्या मुलापर्यंतच्या 894 मुलांवर अभ्यास करण्यात आला. यात 18 महिन्यापर्यंतच्या अध्ययनात 20 टक्के मुलं सरासरी 28 मिनिट स्मार्टफोन आणि टॅबलेटसारखी उपकरणं वापरत असल्याचं आढळून आलं.
स्मार्टफोन किंवा टॅबलेट सारखी उपकरणं हताळणाऱ्या मुलांच्या बोलण्याच्या क्षमतेचा विकास होण्यास वेळ लागतं असल्यचंही दिसून आलं. यातील स्क्रिन टाईममध्ये 30 मिनिटांच्या वेळेत स्पीच डेव्हल्पमेंटचा धोका 49 टक्के असल्याचं संशोधनानंतर डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.
एबीपी माझाने याबाबची सत्यता पडताळली नसून, तुम्ही यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.