11 महिन्याच्या मुलीला गळफास, लाईव्ह पाहून फेसबुकही हादरलं
फेसबुकवरील गैरप्रकार रोखण्यासाठी 3 हजार लोकांचा सेन्सॉर बोर्ड नेमल्याचं खुद्द सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गने सांगितलं.
"त्यामुळे यापुढे जर आक्षेपार्ह व्हिडीओ किंवा पोस्ट फेसबुकवर टाकल्या तर त्याचं अलर्ट सेन्सॉर बोर्डाला मिळेल. जर ती पोस्ट किंवा व्हिडीओ आक्षेपार्ह असेल तर अशा पोस्ट फेसबुकवर अपलोडच होणार नाहीत," असं मार्क झुकरबर्गने स्पष्ट केलं.
सामूहिक बलात्काराचं फेसबुक लाईव्ह, तिघांना अटक
जगभरातील लोक एकमेकांशी जोडले जावेत, मतांची, विचारांची देवाणघेवाण व्हावी, जगभरातील घडामोडींची माहिती मिळावी, यासाठी फेसबुकची निर्मिती झाली होती. पण काही लोक त्याचा गैरवापर करताना दिसतात. धार्मिक विधानं करुन भावना भडकावतात. अश्लील व्हिडीओ पोस्ट करतात. इतकंच नाही तर नुकत्याच आलेल्या फेसबुक लाईव्हवरुन आत्महत्येचं लाईव्ह स्ट्रीमिंगच्याही घटना वाढल्या आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सेन्सॉर बोर्ड असेल.
मुंबईतील ताज हॉटेलच्या 19 व्या मजल्यावरुन उडी घेत तरुणाची आत्महत्या