मुंबई: कमी किमतीत व्हाइस कॉलिंगसारख्या फिचर्ससोबत स्वाइप Tablet X703 लाँच केला आहे. हा टॅबलेट स्नॅपडीलवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. यामध्ये ५.१ची लॉलीपॉप अॅन्ड्रायड ऑपरेटिंग सिस्टीम आणि 1.3GHz(MTK8321) मेडीटेक क्वॉडकोर प्रोसेसर जोडण्यात आला आहे. या टॅबलेटची किंमत 7,499 रुपये आहे.
स्वाइप Tablet X703ची स्क्रिन 10.1 इंच असून 1280 x 800 पिक्सल आहे. यामुळे यूजर्सना उत्तम दर्जाची व्हिडीओ क्वालिटी मिळेल. तसेच या टॅबला 5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा तर दोन मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. याला 8 जीबी मेमरी इनबिल्ट तर 32 जीबीपर्यंत मेमरी वाढवू शकता.
स्वाइप Tablet X703 चे जबरदस्त फिचर्समध्ये 6000mAhपॉवरफुल बॅटरी आहे. यामुळे यूजर्स 6 तास यावर गेम खेळण्याचा आंनद घेऊ शकतो. 150 तासांचा बॅटरी बॅकअप हे याचे वैशिष्टय आहे. यासोबत कनेक्टिविटीसाठी वायफाय, ब्लूटूथ, GPRS पण असेल.