मुंबई : गुगलने अलीकडेच तीन धोकादायक अॅप्स शोधले आहेत. हे तिन्ही अॅप्स वापरणं धोकादायक आहेत. हे अॅप्स युझर्सच्या मशीनमध्ये मालवेअर इन्स्टॉल करतात. हे तीन धोकादायक अॅप्स गुगल प्ले स्टोअरमध्ये असल्याचं गुगलने म्हटलं आहे. गुगलने हे तीन अॅप्स त्यांच्या यादीतून काढून टाकले आहेत आणि आवाहन केलं आहे की, ज्या वापरकर्त्यांनी या तीनपैकी कोणतंही अॅप डाऊनलोड केलं असतील तर कृपया ते त्यांच्या डिव्हाइसवरुन त्वरित काढून टाका, डिलीट करावं.
हे तीन अॅप तुमच्या डिव्हाईसमध्ये इन्स्टॉल होतात आणि मालवेअर म्हणून काम करतात. हे मालवेअर तुमच्या मशीन किंवा डिव्हाईसवरुन लॉगिन क्रेडिन्शियल्स चोरतात. धोकादायक मालवेअर इन्स्टॉल केल्यानंतर मोठ्या प्रमाणात बँकिंग फसवणूक होत असल्याचं दिसून आलं आहे. हे मालवेअर युजर्सच्या परवानगीशिवाय अँड्रॉइड यूजर्सचे पैसे चोरतात.
तुमच्या डिव्हाईसमध्ये असलेले संशयास्पद तीन अॅप्स
1. स्टाईल मेसेज (Style Message)
2. ब्लड प्रेशर अॅप (Blood Pressure App)
3. कॅमेरा PDF स्कॅनर (Camera PDF scanner)
अलिकडच्या वर्षांत अनेक जोकर-आधारित मालवेअर सापडले आहेत. अशा तज्ज्ञ असा सल्ला देतात की, अॅप्स नेहमी Google Play Store वरुनच डाऊनलोड करा आणि डेव्हलपर नोट्स अवश्य तपासा. 'कॅस्परस्की' या सुरक्षा एजन्सीचे संशोधक इगोर गोलोविन यांच्या मते, जोकरसारखे मालवेअर सामान्यतः Google Play वर पसरतात, जेथे स्कॅमर स्टोअरमधून वैध अॅप्स डाऊनलोड करतात, त्यांना चुकीचा कोड जोडतात आणि प्ले स्टोअरवर वेगळ्या नावाने पुन्हा अपलोड करतात.
तुमच्या डिव्हाईसमध्ये हे तीन अॅप इन्स्टॉल असतील तर तातडीने काढून टाका. काही अडचण आल्यास तज्ज्ञांशी संपर्क साधा, असं आवाहन करण्यात येत आहे.
इतर बातम्या
Google : गुगलच्या 15 ॲपमध्ये मोठे बदल, जाणून घ्या अपडेट्सबाबत सविस्तर माहिती
Security Alert : 'या' अँड्राईड युजर्ससाठी धोक्याची घंटा, सुरक्षित राहण्यासाठी करा 'हे' काम