बीजिंग : चीनच्या गैयांग प्रांतात चक्क रोबो हॉटेल सुरू करण्यात आलं आहे. इथे तुमची ऑर्डर घ्यायला वेटर्स नाही तर रोबो येतात. तुमची ऑर्डर घेतात आणि ती आणूनही देतात.
अतिशय आकर्षक रंगसंगतीचे हे रोबो पाहायला या हॉटेलमध्ये एकच गर्दी उसळतेय. रोबोंना मध्येच थांबवून त्यांच्यासोबत फोटोही काढले जात आहेत. रोबो वेटर्स हे इथल्या ग्राहकांचं आकर्षण बनत आहेत. शिवाय ते बोलत नसल्यानं ग्राहकांसोबतचे वादही टाळले जात असल्याचं हॉटेलचे मालक सांगतात.
न थकता सतत काम करणारे हे रोबो एकाचवेळी दोन माणसांचं काम करत आहेत. रोबोंच्या या हॉटेलला सध्या गैयांगमध्ये चांगलीच पसंती मिळत आहे.