मुंबई : वनप्लस या स्मार्टफोन कंपनीने मोबाईलप्रेमींसाठी खास ऑफर जाहीर केली आहे. वनप्लसच्या सर्व स्मार्टफोन्सवर एक्सचेंज आणि पेबॅकच्या ऑफर्स वनप्लसने जाहीर केल्या आहेत. या ऑफरनुसार ग्राहकांना 16 हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे.

 

यामध्ये वनप्लस वन, वनप्लस 2 आणि वनप्लस एक्स स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी तुम्हाला तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करावा लागेल. रिग्लोब आणि अमेझॉनवर या ऑफर उपलब्ध असणार आहेत.

 

नवा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना अमेझॉन वेबसाईटवरुन वनप्लस वन, वनप्लस 2 आणि वनप्लस एक्स या तीन स्मार्टफोनपैकी एक स्मार्टफोन ऑर्डर करावा लागेल. त्यानंतर एक कस्टमर आयडी मिळेल. त्यानंतर ग्राहकांना ‘Mobile Buyback’च्या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. ‘Mobile Buyback’च्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर रिग्लोब साईटची विंडो ओपन होईल.

 

इथे तुम्हाला तुमच्या जुन्या स्मार्टफोनची आणि ऑर्डरसंबंधी शिपिंगची माहिती द्यावी लागेल. जेव्हा ही ऑर्डर तुम्हाला मिळेल, तेव्हाच तुम्हाला कॅशबॅकही दिलं जाईल.