लखनौ : हज यात्रेकरूंना होणारा त्रास टाळण्यासाठी एक मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे. हे  अॅप हज यात्रेकरूंची सुरक्षा आणि त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करेल.  काउंसिल जनरल ऑफ इंडियाकडून इंडियन हाजी इन्फरेमेशन सिस्टम नावाचे हे  अॅप लॉन्च करण्यात आले आहे. यामुळे हज यात्रेकरूंना मोठ्या त्रासापासून वाचण्यासाठी मदत होणार आहे.


हज यात्रेला जाणाऱ्या फ्लाईट पासून ते मदिनामधील लोकेशनपर्यंत सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आणि आपल्या अडचणी दूर करण्यासाठी या अॅपचा उपयोग होणार आहे. सोबत या  अॅपच्या मदतीने हज सेवकांशी संपर्क देखील करता येणार आहे.

स्टेट हज कमिटीचे सचिव राहुल गुप्ता यांनी सांगितलं की,  या अॅपच्या माध्यमातून हज यात्रेकरू भारतीय हज कार्यालयाशी सरळ संपर्क साधू शकतात. तसेच अॅपमध्ये असलेल्या आपत्कालीन टोल फ्री क्रमांक 8002477786 यावर फोन करून आपल्या अडचणी सांगू शकतील. हे  अॅप  हज यात्रेकरू प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकतात.

या  अॅपमध्ये हज यात्रेकरूंना आपला कव्हर क्रमांक, पासपोर्ट क्रमांक आणि मोबाईल क्रमांक नोंदवणे आवश्यक आहे. ही माहिती अपडेट केल्यानंतर  अॅप  सक्रिय होणार आहे.

या  अॅपच्या माध्यमातून हज सेवक कुठे तैनात आहेत. यात्रेकरूंसाठी कोणकोणत्या सुविधा आहेत. हॉस्पिटल, हॉटेल्स यासारख्या सुविधांबाबत देखील माहिती मिळणार आहे.  यामध्ये यात्रेकरूंच्या फीडबॅकची देखील सुविधा आहे.  अॅपवर उर्दू, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये एक फॉर्म भरून यात्रेकरू फीडबॅक देऊ शकतील.