Unified Know-Your-Customer System : वारंवार येणाऱ्या स्पॅम कॉल आणि फ्रॉड कॉल्सला (Spam and Fraud Calls) प्रत्येकजण त्रासलेला आहे. काहींना तर या अनावश्यक कॉल्समुळे आर्थिक फटकाही बसला आहे. पण आता या अनावश्यक कॉल्सपासून सुटका मिळणार आहे. हे कॉल्स बंद होण्याची शक्यता आहे. इतकेच नाही, तर कॉल्स करणाऱ्यांची ओळख पटली तर त्याला शिक्षाही होणार आहे. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, अनफाइड नो योर-कस्टमर सिस्टम (Unified Know-Your-Customer System)याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्राय याबाबत लवकरच घोषणा करु शकते. अनफाइड नो योर-कस्टमर सिस्टम ही सेवा लवकरच दूरसंचार ऑपरेटरसाठी उपलब्ध होणार आहे. यामुळे स्पॅम कॉल्स आणि घोटाळेबाज यांना नियंत्रणात ठेवता येणं शक्य होणार आहे. 


भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (Telecom Regulatory Authority of India) अध्यक्ष पीडी वाघेला यांनीही अनफाइड नो योर-कस्टमर सिस्टमबद्दल माहिती दिली. ते म्हणाले की, सध्याच्या कालात खरा गुन्हेगार कोण आहे? हे ओळखणं सोपं नाही. त्यामुळेच अशा गुन्हेगारांवर चाप बसवण्यासाठी विशेष योजना आखली जात आहे. स्पॅम कॉल्स आणि फ्रॉड कॉल्सला (Spam and Fraud Calls) आळा घालण्यासाठी एक अनफाइड केवायसी (KYC) प्रणाली असणं गरजेचं आहे. त्यासोबतच सर्व दूरसंचार ऑपरेटरांना याचा वापर करता यावा. याला आम्ही एका अॅडवाइस लेटरमध्ये जोडणार आहोत, त्याला अनिवार्य कॉलर आयडी डिस्प्ले (Caller ID Display)मध्ये समावेश केला जाईल. 


फेक कॉल्सवर (Fake Calls) चाप -


भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे(Telecom Regulatory Authority of India) अध्यक्ष म्हणाले की, फेक कॉल्स करणाऱ्यांचा नंबर युजर्सनी ब्लॉक केल्यानंतर आणि प्रॉक्सी सर्वर (Proxy Number) चा वापर केल्यानंतर त्यांनी नव्या क्रमांकाचा वापर सुरु केलाय. त्यामुळं ट्राय सध्या फेक कॉल करणाऱ्या लोकांची माहिती मिळवण्यासाठी सर्व्हिस प्रोव्हायडर्ससोबत काम करत आहे. फेक कॉल्स वाल्यांची माहिती मिळवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence) आणि मशीन लर्निंगचा (Machine Learning) वापर केला जात आहे. 
 
एक वर्षाची शिक्षा -
जे लोक फोन करताना आपला नंबर प्रदर्शित करु इच्छित नाहीत, त्यांच्या चिंतेचं समाधान करण्याचा ट्रायकडून प्रयत्न केला जातोय. नव्या दूरसंचार विधेयकात फसवणूक आणि गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांना एक वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो, असा प्रस्ताव देण्यात आल्याचं ट्रायकडून सांगण्यात आले आहे.