मुंबई : कॉल ड्रॉप किंवा खराब नेटवर्क यामुळे अनेकदा आपल्याला फोनवर नीटसं बोलता येत नाही. पण आता काळजी करण्याचं कारण नाही. कारण की, लवकरच इंटरनेट असलेल्या कोणत्याही ठिकाणाहून थेट कॉल करता येणार आहे. यालाच इंटरनेट टेलीफोनी असं म्हणतात. यासाठी यूजरला फक्त ब्रॉडबॅण्ड नेटवर्कसह वाय-फाय मिळणं गरजेचं आहे.


'ट्राय'कडून शिफारस

इंटरनेट टेलीफोनीची शिफारस ही टेलीकॉम रेग्यूलेटरी अर्थात ट्रायने केली होती. टेलीफोनी सर्विस वापरण्यासाठी यूजरला टेलीकॉम सर्व्हिस प्रोव्हायडरकडून जारी करण्यात आलेलं अॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. ज्यांच्या मोबाइलचं नेटवर्क खराब असेल त्यांच्यासाठी हा पर्याय अतिशय उत्तम आहे. मात्र, यासाठी त्यांचं वाय-फाय सिग्नल मजबूत असणं गरजेचं आहे.

मोबाइल क्रमांक बदलण्याची गरज नाही

इंटरनेट टेलीफोनीचा वापर करण्यासाठी यूजरला फक्त एक अॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. यूजरकडे ज्या कंपनीचं सिम कार्ड असेल त्याच कंपनीचं टेलीफोनी अॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. त्यामुळे आता यूजर्सला आता फोनसाठी नेटवर्कही अवलंबून राहावं लागणार नाही.