लंडन : फेसबुक डेटा लीक प्रकरणात केंद्र स्थानी असलेल्या केम्ब्रिज अॅनालिटिका या कंपनीने आपलं सारं कामकाज त्वरित बंद केल्याची घोषणा केली आहे. या कंपनीनं अमेरिका आणि ब्रिटनमध्ये स्वतःला दिवाळखोर घोषित करण्यासाठी निवेदन देण्याचीही घोषणा केली आहे.
केम्ब्रिज अॅनालिटिका या कंपनीवर फेसबुकच्या कोट्यवधी लोकांचा व्यक्तीगत डेटा चोरी करुन त्याचा दुरुपयोग केल्याचा आरोप आहे.
आम्ही आता व्यवसाय करु शकत नाही. असे कंपनीने जाहीर केले आहे. केम्ब्रिज अॅनालिटिका ही अमेरिकेतील एक मोठी अॅनॅलिसिस फर्म आहे. या कंपनीनं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी काम केल्यानं त्याची चर्चा झाली होती.
२०१६ मध्ये या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा जो विजय झाला त्याचे अप्रत्यक्ष श्रेय केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीलाही दिले गेलं.
काय आहे प्रकरण?
2017 साली अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मदत करणाऱ्या 'केम्ब्रिज अॅनालिटिका' या कंपनीने जवळपास 5 कोटी फेसबुक यूजर्सची वैयक्तिक माहिती चोरली, असा आरोप करण्यात आला होता. या चोरलेल्या माहितीचा निवडणुकीत वापरही केला, असाही आरोप आहे.
केम्ब्रिज अॅनालिटिका ही ब्रिटनस्थित कंपनी आहे. या कंपनीमुळेच फेसबुकवरील युजर्सच्या माहितीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत.
फेसबुक डेटा चोरी : केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीचं कामकाज बंद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 May 2018 09:21 AM (IST)
फेसबुक डेटा लीक प्रकरणात केंद्र स्थानी असलेल्या केम्ब्रिज अॅनालिटिका या कंपनीने आपलं सारं कामकाज त्वरित बंद केल्याची घोषणा केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -