सोनी एक्सपीरिया XZs ब्ल्यू, वार्म सिल्व्हर आणि ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध असेल. 19 मेगापिक्सेलचा मोशन आय कॅमेरा हे या फोनचं वैशिष्ट्य आहे. ज्यात 960 फ्रेम/सेकंडच्या वेगाने सुपर स्लो मोशन व्हिडिओ रेकॉर्ड केला जाऊ शकतो. यामध्ये 4K व्हिडिओही रेकॉर्ड केला जाऊ शकतो.
या फोनमध्ये 19 मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि 13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. शिवाय 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज देण्यात आलं आहे.
एक्सपीरिया XZs चे फीचर्स
- अँड्रॉईड 7.0 नॉगट
- 5.2 इंच आकाराची स्क्रीन
- 64 बिट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 820 प्रोसेसर
- 19 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 4GB रॅम आणि 64GB इंटर्नल स्टोरेज
- 2,900 mAh क्षमतेची बॅटरी