मुंबई : मोबाइल कंपनी शाओमीनं ख्रिसमसनिमित्त No 1 Mi Fan सेल आणला आहे. आजपासून (बुधवार) सुरु झालेला हा सेल 21 डिसेंबपर्यंत असणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, पॉवर बँक आणि इतर अॅक्सेसरीजवर बरीच सूट देण्यात आली आहे. तसेच काही स्मार्टफोन हे अवघ्या 1 रुपयातही खरेदी करता येणार आहे.
या सेलमध्ये शाओमी Mi Mix 2, रेडमी 5A, रेडमी नोट 4 या स्मार्टफोनसाठी खास ऑफरही देण्यात आल्या आहेत.
Redmi 5A : हा स्मार्टफोन ग्राहकांना अवघ्या एक रुपयात खरेदी करता येणार आहे. कंपनीनं या स्मार्टफोनचा 1 रुपयाच्या फ्लॅश सेलमध्ये समावेश केला आहे. हा फ्लॅश सेल उद्या दुपारी दोन वाजता होणार आहे. या फोनची किंमत 4,999 रुपये एवढी आहे.
Redmi Y1 Lite : हा स्मार्टफोन देखील तुम्ही अवघ्या 1 रुपयात खरेदी करु शकतात. हा स्मार्टफोन फ्लॅश सेलमध्ये खरेदी करता येणार आहे. याशिवाय 7,999 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन 6,999 रुपयातही खरेदी करता येणार आहे.
Mi Mix 2 : No 1 Mi फॅन सेलमध्ये Mi Mix 2 हा स्मार्टफोन 32,999 रुपये किंमतीला उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किंमत 35,999 रुपये आहे. या सेलमध्ये यावर 3000 रुपयांची सूट देण्यात आली आहे.
Redmi Note 4 : शाओमीचा सर्वात यशस्वी ठरलेला स्मार्टफोन रेडमी नोट 4 वर 1000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन आता 9,999 रुपयात खेरदी करता येईल.
संबंधित बातम्या :
मोटो G5S आणि G5S प्लस स्मार्टफोनवर तब्बल दोन हजारांची सूट
अवघ्या 1 रुपयात रेडमी 5A स्मार्टफोन, शाओमीचा नवा सेल सुरु!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Dec 2017 07:12 PM (IST)
मोबाइल कंपनी शाओमीनं ख्रिसमसनिमित्त No 1 Mi Fan सेल आणला आहे. आजपासून (बुधवार) सुरु झालेल्या हा सेल 21 डिसेंबपर्यंत असणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -