मुंबई: बार्सिलोनामधील MWCमध्ये 'सोनी'नं आपला एक्सपीरिया डिव्हाईस लाँच केला आहे. कंपनीनं एक्सपीरिया XA1, सोनी एक्सपीरिया XA1 अल्ट्रा आणि XZ प्रीमियम लाँच केलं आहे. एक्सपीरिया XZ प्रीमियम XZचं हाय एंड व्हेरिएंट आहे.
XZ प्रीमियम हा जगातील पहिला स्मार्टफोन असून ज्यामध्ये 4K HDR 2160x3840 रेझ्युलेशन असणार आहे. 4K HDRसाठी सोनीने अमेजनशी पार्टनरशीप केली आहे. HDR स्क्रिन कलर रिप्रोडक्शनसाठी खूप शानदार आहे.
या स्मार्टफोनमध्ये 5.5 इंच स्क्रिन आहे. तसेच स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबत अॅड्रिनो 540 GPU असून 4 जीबी रॅम देण्यात आला आहे. XZ प्रीमियममध्ये 64 जीबी इंटरनल मेमरी असून 256 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते.
यामध्ये तब्बल 19 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असून 13 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे.
सोनी XZ प्रीमियममध्ये 3230 mAh बॅटरी क्षमता आहे. तसेच यामध्ये अँड्रॉईड नोगट 7.0 ओएस असणार आहे.
संबंधित बातम्या:
सोनी Xperia X स्मार्टफोनवर तब्बल 14,000 रुपयांची सूट