मुंबई : गेल्या महिन्यात सोनीने आपला मिडरेंज एक्सपीरिया X सीरीज भारतात लॉन्च केला होता. या सीरीजचा स्मार्टफोन एक्सपीरिया X पहिल्यासून विक्रीसाठी उपलब्ध आहे. आता दुसरा स्मार्टफोन एक्सपीरिया XA स्मार्टफोन 22 जूनपर्यंत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनची किंमत 20 हजार 900 रुपये आहे.   एक्पीरिया XA स्मार्टफोनचे फीचर्स :
  • 5 इंचाचा स्क्रीन
  • 64 बिटचं मीडिया टेक MT 6755 प्रोसेसर
  • 2 जीबी रॅम
  • 16 जीबी स्टोरेज
  • मायक्रोएसडीच्या मदतीने 200 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा
  • 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
  • 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • 61 सेकंदात एक फोटो कॅप्चर करण्याचा कंपनीचा दावा
  • अँड्रॉईज मार्शमेलो ऑपरेटिंग सिस्टम
  • Xperia X स्मार्टफोनमध्ये 2,620mAh बॅटरी क्षमता
  • Xperia XA स्मार्टफोनमध्ये 2,300mAh बॅटरी क्षमता
  या स्मार्टफोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ इत्यादी कनेक्टिव्हिटीसोबत ड्युअल सीमची सुविधा आहे. दोन्ही स्मार्टफोनना 4G नेटवर्क सपोर्ट करु शकेल.